अकोट पोलीस ठाण्यात आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात तक्रार दाखल

राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची बदनामी व अवहेलना करणारे वक्तव्य केले.
Amol Mitkari Latest News Updates, FIR filed against Amol Mitkari
Amol Mitkari Latest News Updates, FIR filed against Amol MitkariSaam Tv
Published On

अकोला - सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ब्राह्मण समाजाबद्दल टिंगल-टवाळी करून अवहेलना केली. त्यामुळे आमदार मिटकरी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार अकोट शहर येथील मयूर मुकुंदराव आसरकर यांनी अकोट शहर पोलीस (Police) ठाण्यात आज दिली आहे. (Amol Mitkari Latest News Updates)

सांगली येथील इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची सभा 20 एप्रिल रोजी पार पडली. या सभेत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची बदनामी व अवहेलना करणारे वक्तव्य केले. या वक्तव्याने ब्राह्मण समाजाबद्दल लोकांमध्ये अतिशय चुकीचा संदेश गेला आहे. विवाह सयमी वधू-वराला अर्पण करणे ऐवजी लग्न लावणारा ब्राह्मण पुरोहित ती वधु स्वतःला अर्पण करण्याचा मंत्र म्हणतो. मम भार्या समर्पयामि असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. या वक्तव्याने ब्राह्मण समाजाबद्दल आकस निर्माण होऊन त्यायोगे सामाजिक सलोखा नष्ट व्हावा, असा प्रयास आमदार मिटकरी यांनी केला आहे.

हे देखील पाहा -

वास्तविक लग्नप्रसंगी होणाऱ्या कन्यादान विधीच्या वेळी किंवा अन्य कोणत्याही विधीचे वेळी वधू ब्राह्मणाला अर्पण करणारा कोणताच मंत्र म्हंटले जात नाही. तरीही अमोल मिटकरी यांनी धादांत खोट्या मंत्राचा उल्लेख करून ब्राह्मणांबद्दल समाजात आकस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाचाच एक अंग असलेल्या संवैधानिक पदावरील व्यक्तीने असे खोटे वक्तव्य करणे हे समाजासाठी घातक आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद समाजावर अत्यंत वाईट परिणाम करणारे ठरणार आहे. या वक्तव्याने जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बाधित होण्याची साधार भीती आहे.

विशेष म्हणजे, आमदार मिटकरी यांनी समाजविघातक वक्तव्यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी हसून प्रतिसाद दिला. यावरून राज्यात सत्तेत असलेले मंत्री हे सुद्धा ब्राह्मण या विशिष्ट जाती विरोधी असल्याचे स्पष्ट होते. शासनातील मान्यवरांनी असे वक्तव्य वर्तन केल्याने राज्यातील जनतेत त्याचे अनिष्ट परिणाम होणार आहेत. त्यामुळे सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर व त्यांना दाद देणाऱ्यांवर सखोल चौकशी अंती कडक कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुकुंद आसरकर यांनी ही तक्रार अकोट शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com