PM Fasal Bima Yojana Update : पीएम फसल बिमा योजना शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची? कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा सविस्तर

Famers News : योजनेमुळे शेतकऱ्यांना पीकाचं नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळते.
farmer
farmerSaam TV
Published On

Mumbai News : प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवली जाणारी केंद्र सरकारची योजना आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई दिली जाते. त्यामुळे देशातील अधिकाधिक शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत मिळते.

शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीत आर्थिक मदत करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहित करणे अशा विविध उद्धिष्टांसह ही योजन सरकारने 2016 मध्ये सुरू केली होती. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पीकाचं नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळते.

शेतीवर अवलंबून असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. छोट्या शेतकऱ्याकडे फारसे भांडवल उपलब्ध नसते. शेती केली तरच त्याला उत्पन्न मिळणार असतं. अशा स्थितीत पिकाच्या लागवडीत पैसे अडचण ठरू नये यासाठी ही योजना फायदेशीर आहे.  (Tajya Marathi Batmya)

farmer
Pavsali Adhiveshan 2023: वेदांता, टाटा एअरबससह मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले? सरकार अधिवेशनातच सादर करणार श्वेतपत्रिका

प्रीमियम किती भरावा लागेल?

तुम्हाला पीएम फसल विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला निश्चित प्रीमियम भरावा लागेल. हा प्रीमियम खूपच कमी आहे जो प्रत्येकजण भरू शकतो. खरीप पिकासाठी, तुम्हाला विम्याच्या रकमेच्या २ टक्क्यांपर्यंत प्रीमियम भरावा लागेल. त्याचबरोबर रब्बी पिकासाठी १.५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम भरावा लागेल. याशिवाय, बागायती पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या जास्तीत जास्त 5 टक्के प्रीमियम म्हणून भरावा लागतो. (Latest Marathi News)

कुठे कराल अर्ज?

आता खरीप पिकांच्या विम्यासाठी सरकारने अर्ज मागवले होते. 31 जुलैपर्यंत प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या www.pmfby.gov.in या पोर्टलवरुन शेतकरी यासाठी अर्ज दाखल करु शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्याच्या पिकाचे वैयक्तिक नुकसान झाले असले तरी त्याचा फायदा त्याला मिळेल. पूर्वी खराब पिकावर सामूहिक स्तरावरच लाभ मिळत होता. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून भरपाई दिली जाते.

farmer
Tomato Theft : बाजारपेठेतून चक्क टमाट्यांची चोरी; महागलेल्या टमाट्यावर चोरट्यांनी नजर

किसान क्रेडिट कार्ड किंवा सहकारी बँकांकडून कर्ज घेणारे शेतकरी स्वयंचलित बँकेद्वारे विमा उतरवतात. दुसरीकडे, जर तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या www.pmfby.gov.in या पोर्टलला भेट देऊन अर्ज केला असेल, तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकाल. तसेच, शेतकरी घरबसल्या PMFBY AIDE अॅपद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी अर्ज कसा कराल?

  • PMFBY च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

  • होमपेजवर Farmers Corner वर क्लिक करा

  • तेथे तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा आणि तुमचे खाते नसेल तर नव्याने लॉग इन करा

  • नाव, पत्ता, वय, राज्य इत्यादी सर्व आवश्यक तपशील एंटर करा.

  • शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.

farmer
Ratnagiri Rain News: जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; खेड पुराच्या उंबरठ्यावर, अनेक दुकानं पाण्याखाली

कोणती कागदपत्रे आवश्यक?

पीएम फसल विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे रेशनकार्ड, आधारशी लिंक असलेला बँक खाते क्रमांक, ओळखपत्र, शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, शेतीचा खसरा क्रमांक, शेतकऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र, शेत भाड्याने घेतले असल्यास, शेतमालकाशी केलेल्या कराराची झेरॉक्स असणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com