Sadabhau Khot: चमकोगिरीविरोधात शेतकऱ्यांचा संताप,सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांचा घेराव

Farmers Protested Against Sadabhau Khot In Solapur: अतिवृष्टीमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू असताना नेत्यांची मात्र मदतीच्या नावाखाली चमकोगिरी सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि पाहणी करण्यास आलेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोतांना हुसकाऊन लावलं...
Angry farmers in Solapur’s Madha taluka chase away Sadabhau Khot during his flood inspection visit, demanding urgent relief instead of political showmanship.
Angry farmers in Solapur’s Madha taluka chase away Sadabhau Khot during his flood inspection visit, demanding urgent relief instead of political showmanship.Saam Tv
Published On

हा आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप...राज्यात अतिवृष्टीने विदारक परिस्थिती निर्माण झालीय.. मात्र राजकीय पक्षाचे नेते फक्त चमकोगिरी करण्यासाठी येतात.. त्यामुळे आता चमकोगिरी नको तर मदत देण्याची मागणी करत सोलापूरच्या माढा तालुक्यातील उंदरगावच्या शेतकऱ्यांनी आमदार सदाभाऊ खोतांवर प्रश्नांची सरबत्ती केली..

शेतकरी अतिवृष्टीने हवालदिल झाला असताना सदाभाऊ खोत तब्बल 8 दिवसांनी पाहणीसाठी पोहचले.. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोतांना घेराव घालून हाकलून दिले...तर आता फक्त हुसकावलं...उद्या शेतकरी तुडवतील, असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय.. तर सांगली कोल्हापूर प्रमाणे आताच्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याची मागणी सदाभाऊ खोतांनी केलीय...

फक्त सदाभाऊ खोतच नाही तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेराव घालून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.तर दुसरीकडे तातडीने मदतीसाठीही शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचीही कोंडी केली.. यावेळी मात्र महाजनांनी मी पैसे खिशात घेऊन हिंडत नसल्याचं मग्रुर वक्तव्य केलं...

खरंतर शेतकरी संकटात आहे.. त्याला ठोस नुकसान भरपाई देणं गरजेचं असताना केवळ नेत्यांनी चमकोगिरी केली.. मात्र 2023 च्या जीआरनुसार हेक्टरी 8500 रुपये तुटपुंजी मदत केली.. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे... आता सरकारने चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना आवर घालून ठोस मदत देत शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com