वयोवृद्ध झालेल्या आजोबा आजींच्या चना-पोहाची सोशल मीडियावर धुमाकूळ (Video)

सकाळी 6 वाजता पासून दुपारी 1 वाजे पर्यंत हे आजी-आजोबा स्टॉल लावतात.
वयोवृद्ध झालेल्या आजोबा आजींच्या चना-पोहाची सोशल मीडियावर धुमाकूळ (Video)
वयोवृद्ध झालेल्या आजोबा आजींच्या चना-पोहाची सोशल मीडियावर धुमाकूळ (Video)मंगेश मोहिते
Published On

मंगेश मोहिते

नागपूर - तांडापेठ परिसरात राहणारे भास्कर तानबाजी जुनघरे आणि त्याची पत्नी सुमित्राबाई यांच्या मुलाचा लहान वयात मृत्यू झाल्याने आणि 5 तरुण मुलींचे लग्न झाल्याने वयोवृद्ध झालेल्या आजी आजोबास ताठ मानेने जगता यावे म्हणून नागपूरकरांनी भरघोस पाठिंबा देऊन त्यांचा आर्थिक पाया भक्कम केला आहे. नागपूरच्या तांडापेठ येथिल भास्कर ताणबाजी जुनघरे आणि त्याची पत्नी सुमित्राबाई जुनघरे हे आपल्या 5 मुलींसोबत भाड्याच्या घरात राहत असून त्या मुलींचे लग्न झाल्याने ते पूर्णतः निराश्रित झाले होते.

सोबतच आर्थिक स्त्रोत देखील पूर्णपणे बंद झाले होते. घराचे भाडे, इलेक्ट्रिकच बिल आणि घर चालवायचे कसे अशा मनस्थितीत असतांना 70 वर्षांच्या आजोबा आणि आजीने तांडापेठ परिसरात गेल्या चार वर्षा पासून चना-पोहाचा स्टॉल लावला. सकाळी 6 वाजता पासून दुपारी 1 वाजे पर्यंत हे आजी-आजोबा स्टॉल लावतात. दोघांची मेहनत आणि चिकाटी बघून परिसरातील नागरिकांनी आर्थिक आधार मिळावा या दृष्टीकोनातून आजोबाच्या चना पोहाच्या स्टालवर गर्दी करण्यास सुरुवात केली.

वयोवृद्ध झालेल्या आजोबा आजींच्या चना-पोहाची सोशल मीडियावर धुमाकूळ (Video)
श्रीरामपूरमधला 'तो' बिबट्या अखेर जेरबंद (पहा व्हिडिओ)

इतकेच नाही तर काही एनजीओ आणि स्वयंसेवीसंस्थांनी देखील त्यांच्या कामात थोडा हातभार लावला. तर काही युवकांनी त्यांच्या मेहनतीच्या कामाचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांच्या या व्हिडिओला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. याच उदाहरण म्हणजे फक्त पोहा खाण्यासाठी काही युवक-युवती अंतर कापून त्यांच्या स्टालवर येतात. बघता बघता आजोबांच्या स्टॉलवर गर्दी वाढू लागली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com