Expired Ice Cream: तुम्ही खाताय विषारी आईसक्रीम,एक्सप्रायरी डेट लपवून विक्री,गारेगार आईसक्रीम बेतेल जीवावर?VIDEO

Bhandara News: “आईस्क्रीम खाल तर थेट दवाखान्यात जाल”....असं आम्ही म्हणतोय त्याला एक घटना कारणीभूत आहे. भंडा-यातील एका मॉलमध्ये चक्क एक्सपायरी झालेल्या आईस्क्रीमची विक्री होत होती. पाहूया एक रिपोर्ट..
ice cream
ice creamsaam tv
Published On

उन्हाळ्यात चवीनं आईस्क्रीम खाताय तर सावधान...! आम्ही असं म्हणतोय कारण गारेगार आईसक्रीम विषही ठरू शकतं.य कारण भंडाऱ्यात घटनाच अशी घडलीय. तुमसरमधील अभिषेक भुरे या तरुणाने एका कंपनीच्या संत्रा बर्फी फ्लेवरचं आईस्क्रीम विकत घेतलं होतं. त्या बॉक्सवर एकावर एक स्टिकर लावलेले आढळून आले. वरचा स्टिकर काढल्यानंतर खालचा स्टिकर पाहून धक्काच बसला. कारण आईसक्रिमची एक्सप्रायरी डेट उलटून गेली होती.

हे आईस्क्रीम 'एकावर एक फ्री' अशा आकर्षक ऑफर अंतर्गत विक्रीस ठेवण्यात आले होते. जेणेकरून ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतील. उन्हाळ्यात थंडगार पदार्थांची मागणी वाढत असते. याचाच गैरफायदा घेत ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन, ग्राहक संरक्षण विभाग आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ice cream
Nashik News : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगची एन्ट्री; भर दिवसा एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ

अशा घटनांच्या पार्श्वभूमिवर डॉक्टरांनीही नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिलाय. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरता येणार नाही. पण तब्येतही चांगली ठेवायची असेल तर आईसक्रीम असो किंवा आणखी कुठला गारेगार पदार्थ एक्सपायरी डेट तपासूनच खाण्याचा आनंद लुटा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com