तनपुरे कारखान्याचे आधी लोखंड खाल्ले, आता दगड-मातीही गिळली

दगड खाण
दगड खाण

अहमदनगर : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याच्या राजकारणाचा गोंधळ मिटायला तयार नाही. अगोदर कारखाना बंद पाडला गेला. नंतर वीजजोड तोडून नामुष्की ओढावली गेली. आता भलतेच प्रकरण समोर आले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची मालमत्तेची लयलूट सुरू आहे. आधी कारखान्याचे लोखंड खाल्ले आता दगड-माती खाण्याचे काम सुरू आहे.

मालकीच्या, देवळाली प्रवरा पालिका हद्दीतील जमिनीतून अवैध गौण खनिज उत्खनन करून, कारखाना व शासनाची कोट्यवधींच्या महसुलाची लुबाडणूक झाली. त्याची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे करण्यात आली आहे. Excavation from the land of Tanpure Sugar Factory

दगड खाण
रोहित पवार फडकवणार भगवा, तोही सर्वात उंच!

मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम व आप्पासाहेब कोहकडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, की कारखान्याच्या मालकीच्या देवळाली प्रवरा हद्दीतील गट क्रमांक ५३५/६ मधील संपूर्ण जमिनीतून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन झाले. त्याचे मोजमाप करून पंचनामा करण्यात यावा.

या अवैध उत्खननाला प्रशासनाचे प्रमुख म्हणून कारखान्याचे कार्यकारी संचालक जबाबदार आहेत. ते किंवा प्रशासनातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी येते. कारखान्याचे व्यवस्थापनही यात दोषी आहे. मालमत्तेचे विश्वस्त असूनही या सर्वांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. किंबहुना, त्यांच्याशी हातमिळवणी करून गौण खनिजाचे उत्खनन झाले आहे.

कारखाना व शासनाच्या कोट्यवधींच्या महसुलाची लुबाडणूक झाली आहे. त्याची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यात यावी, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. Excavation from the land of Tanpure Sugar Factory

धुमाळ, कदम व कोहकडेंचा तक्रार अर्ज आला आहे. यापूर्वीही तक्रारी आल्या. त्यावेळी कारखान्याला अवैध गौण खनिज माफियांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास कळविले होते. जागेचा पंचनामा करून, महसुलाच्या वसुलीसाठी कारखान्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी‌

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com