हिंगोलीतील एसटी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हिंगोलीमध्ये एसटी संपात (ST Strike) सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे.
संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूSaam Tv
Published On

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीमध्ये एसटी संपात (ST Strike) सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. आर. बी. बेंद्रे असे या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी शहराच्या बस आगारात वाहक या पदावर कार्यरत होते. - Employee involved in ST strike in Hingoli dies of heart attack

बेंद्रे हे एसटी संपामध्ये सुरुवातीपासूनच सहभागी होते. मात्र, त्यांना वारंवार कामावर येण्यासाठी आगारातील अधिकारी तगादा लावून होते. कामावर हजर न झाल्यास कारवाई करण्याची धमकी देत असल्याचा आरोपही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा -

संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मेस्मा कारवाई ? अनिल परब म्हणाले...

धुळ्यातही कर्मचाऱ्याचा मृत्यू

तर गुरुवारी (17 डिसेंबर) मेस्मा लागण्याच्या भीतीने धुळ्यातील एसटी आंदोलन कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. धुळे आगारातील आंदोलक एसटी कर्मचारी संजय सोनवणे हे वाहक होते.

गेल्या महिनाभरापासून एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे यासाठी सुरु असलेल्या संपात ते सामील होते. गुरुवारी सकाळपासूनच संपात सामील असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरती मेस्मा लागल्या संदर्भातील चर्चा सुरु होती. त्याचीच भीती मनात बाळगल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

मेस्मा कारवाईबाबत सध्या कुठलाही निर्णय नाही - अनिल परब

एसटी संपासंदर्भात गुरुवारी एसटी कार्यालयात परिवहन मंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडली. मेस्माअंतर्गत (MESMA) कारवाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तर, या प्रकणावरील कारवाई करण्याबद्दल कसलाही निर्णय झालेला नाही, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिलीये. कोर्टाचा निर्णय 20 तारखेला होणार आहे. तोपर्यंत कसलीही कारवाई करणार नाही. त्याचबरोबर मेस्मा संदर्भात कसलीही चर्चा झालेली नाही अशी माहितीही परब यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा गेल्या आठवड्यात मंत्री अनिल परब यांनी दिला होता. परंतु तरीही राज्यातील एसटीच्या विविध आगारांमधे कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबरपासून आंदोलन सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com