पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना तातडीची 10 हजारांची मदत- विजय वडेट्टीवार

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीची 10 हजार रुपयांची मदत केली आहे.
पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना तातडीची 10 हजारांची मदत- विजय वडेट्टीवार
पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना तातडीची 10 हजारांची मदत- विजय वडेट्टीवारSaam Tv
Published On

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीची 10 हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच दरड कोसळून जी कुटुंब उद्धवस्थ झाली आहेत अशा कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्याची घोषणा केली जाईल असही वडेट्टीवार यांनी सांगिंतलं. तसेच जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करणार असल्याचही वडेट्टीवार यांनी सांगितलं.Emergency relief of Rs 10,000 to flood-hit families

हे देखील पहा-

तसेच सतत होणा-या या दूर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याच नवं पुर्नवसन धोरण जाहिर करणार असून या नव्या धोरणाची चर्चा अंतीम टप्प्यात असून या बाबतचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थाप मदत पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज सायंकाळी ५ वाजता राज्यातील आपत्तींबाबत आणि पुर्नवसनाच्या नव्या धोरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीCM,Dcm यांच्यासोबत आढावा बैठक घेतली जाणार असून राज्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दिर्घकालीन प्रोग्राम तयार होतोय सध्याच्या आपत्तीत NDRF च्या टीमला वेळेत पोहोचणं शक्य झालं नाही, टीम उशीरा पोहोचल्यामुळे मोठं नुकसान झाल्याची कबुलीही वडेट्टीवारांनी दिली.

NDRF ला सक्षम पर्याय उभा करणार

'एनडीआरएफ'वर अवलंबुन रहावं लागु नये म्हणून 'एनडिआरएफ' NDRF च्याच धर्तीवर तेवढ्याच ताकदीची एकेक टीम प्रत्येक जिल्ह्यात उभी करणार प्रत्येक जिल्ह्यात नव्यानं एसडीआरएफची एक टिम कायमस्वरुपी स्टॅडबाय ठेवणार,StandBy त्यासाठी पात्र तरुणांची भरतीही करणार. प्रत्येक टीमTeam मध्ये २५ ते ३० जण संपूर्ण महाराष्ट्रात ६०० ते ७०० जणांच्या वेगवेगळ्या टीम उभ्या करणार. आतापर्यंत आपण पोलिसांनाच आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून काम करवून घ्यायचो मात्र आता नव्यानं तरुणांचं प्रशिक्षणTraining करुन त्यांची भरती करुन त्यांच्या टीम तयार करण्यात येणार आहेत.

तसेच आता पुर्नवसनRehabilitation 3 टप्प्यात म्हणजेच अतिधोकादायक, धोकादायक, आणि कमी नुकसान होणारी गावं असे करण्यात येणार आहे. तसेच याकरता जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागितले असून येत्या ६ ते ८ महिन्यात हे पुर्नवसन केले जाईल मात्र या मदत पुर्नवसनासाठी सरकारी तिजोरीवर मोठा ताण येणार आहे. गरज पडल्यास १००० ते २००० कोटींचा निधी कर्ज घेऊन उभा करु आप्ततीग्रस्तांसाठी १० हजारांची मदत ही तातडीची मदत जाहिर केली असून २०१९ च्या जीआरच्या आधारे मदत केली जाईल २०१९ च्या पुरापेक्षा नुकसान कमी आहे त्यावेळी घरातलं सामान काढायलाही वेळ मिळाला नव्हता यावेळी परिस्थिती त्यामानाने बरी होती.

पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना तातडीची 10 हजारांची मदत- विजय वडेट्टीवार
मित्राच्या लग्नासाठी जात असताना स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 5 जण जखमी

तळीयेकरांच पुनर्वसन म्हाडातर्फे

तळीयेच्या नागरिकांची घरं बांधण्याची जबाबदारी म्हाडानं घेतलीय ३५ ते ३६ घरांचं गाव उभारण्यासाठी जागा शोधण्याचं काम सुरु आहे. मदत पुर्नवसनRehabilitation त्या घरांसाठी इतर सोयीसुविधा पुरवणार असल्याचही विजय वड्डेटीवारांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com