लातूर : शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या विरोधात बंड पुकारल्याचे पडसाद लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील चापोली (Latur) येथे उमटले आहेत. या बंडाच्या विरोधात चापोली येथे शिवसेना आणि युवासेनेकडून एकनाथ शिंदेंसह बंडखोरांचे छायाचित्र असलेले बॅनर जाळून निषेध व्यक्त केला आहे. (Eknath Shinde Latest News)
हे देखील पाहा -
एकनाथ शिंदे गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील शिवसेनेच्या ४८ आणि १० अपक्ष आमदारांना घेऊन गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये या बंडखोरांनी मुक्काम ठोकला असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआ सरकार विरुद्ध बंड पुकारले आहे. जाळण्यात आलेल्या बॅनरवर गद्दार असे लिहून त्या बॅनरला जोडे मारून ते बॅनर जाळून शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. हे आमदार जरी गद्दार झाले असले तरी शिवसेनेचा कार्यकर्ता हा कधीही गद्दार होणार नाही. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळात चाकूर तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत करू अशा प्रतिक्रीया युवा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार यांनी आंदोलनानंतर माध्यमांना दिल्या.
दरम्यान शिवसेनेने १५ आमदारांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या १५ आमदारांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस पारडीवाला यांच्या बेंच समोर सुनावणी होणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत उपसभापती, राज्य विधानसभेचे सचिव, महाराष्ट्र सरकार, शिवसेनेचे उपनेते अजय चौधरी, शिवसेनेचे सुनील प्रभू आदींचा समावेश आहे. तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांच्याकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. तसेच शिवसनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.