शिंदे गटात फूट पडणार?; संजय सिरसाटांकडून ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट, चर्चांना उधाण

शिंदे गटात सामील झालेले आमदार संजय सिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट केला.
Maharashtra Political Crisis, Sanjay Shirsat News,
Maharashtra Political Crisis, Sanjay Shirsat News,Saam TV
Published On

औरंगाबाद : एकनाथ शिंदे गटात सामील झालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून केला. यासोबत त्यांनी ठाकरेंचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओही जोडला. या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे आता शिंदे गटात फूट पडणार का? मंत्रिपद न मिळाल्याने संजय सिरसाट आता पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार की काय? अशा प्रकारच्या चर्चा सुरु आहेत. (Sanjay Shirsat Latest News)

Maharashtra Political Crisis, Sanjay Shirsat News,
घरोघरी तिरंगा अभियानामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची लाट : CM शिंदे

दरम्यान, सिरसाट यांच्याकडून काही वेळातच हे ट्विट डिलीटही करण्यात आलं. संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट मधून उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषणही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं होतं. त्यामध्ये उद्धव ठाकरे दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असं उद्धव ठाकरे म्हणत होते.

संजय शिरसाट यांची अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाहीये. त्यामुळे संजय शिरसाठ यांना मंत्रिपदाचे वचन मिळालं होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाठ यांचे हे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित करणार हे ट्विट आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीटही केलं. (Sanjay Shirsat News)

(Sanjay Shirsat Tweets
(Sanjay Shirsat TweetsTweeter

दरम्यान, 'आम्ही आजही शिवसेनेत आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आम्ही उद्धव ठाकरे यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. आज जरी आमचे भांडण जरी झालं असलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. आम्ही दूर जरी झालो असलो तरी ते आमचे कुटुंबप्रमुख होतेच. त्यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती'.

'आमची भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधात नसून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होती. विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेलं नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर आणि ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहिले', म्हणत ट्वीट डिलीट केल्यानंतर शिरसाटांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com