एक हजार फुट खोल दरीतून बाहेर काढली आठशे किलोची शिवकालीन तोफ!

एक हजार फूट खोल दरीतून आठशे किलोची तोफ सोनगड किल्याच्या कड्या कपारीतून गडावर विराजमान करण्यात आली.
एक हजार फुट खोल दरीतून बाहेर काढली आठशे किलोची शिवकालीन तोफ!
एक हजार फुट खोल दरीतून बाहेर काढली आठशे किलोची शिवकालीन तोफ!अनंत पाताडे
Published On

सिंधुदुर्ग - मावळा प्रतिष्ठान कोल्हापूरच्या निष्ठावंत मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी रांगणा तोफ मोहीम फत्ते केल्यानंतर आज किल्ले कुडाळ तालुक्यातील सोनगड येथील इंग्रजांनी 150 वर्षांपूर्वी ढकलून दिलेली एक हजार फूट खोल दरीतून आठशे किलोची तोफ सोनगड किल्याच्या कड्या कपारीतून गडावर विराजमान करण्यात आली.

हे देखील पहा -

सोनगड तोफ मोहिमेसाठी पन्नास हून अधिक मावळ्यांनि सलग तीन दिवसाच्या करो या मरो कालावधी मध्ये ही मोहीम पार पाडली. सदर तोफ मोहिमेसाठी संघर्ष ग्रुप खानापूर आणि शिवाज्ञा ग्रुप यांचा फार मोलाचा सहभाग लाभला.

एक हजार फुट खोल दरीतून बाहेर काढली आठशे किलोची शिवकालीन तोफ!
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत 1 हजार 584 पदांची भरती

मावळा प्रतिष्ठान ने मागील मोहीम रांगणा किल्ल्यावर घेतलेली होती रांगणा किल्ल्याच्या अंदाजे अठराशे फूट खोल दरीतून 1000 किलोची तोफ गडावरती घेऊन इतिहास रचला होता त्याचप्रमाणे आज प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी सोनगड किल्ल्याच्या दरीमध्ये कोसळलेली एक तोफ गडावर घेऊन आणखी एक शिवकार्य पदरी पाडले. सदर किल्यावरती पाण्याचा कोणताही स्त्रोत नसताना मावळ्यांनी मोहीम फत्ते केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com