...म्हणून अनिल परब यांना ED ने पाठवली नोटीस

पालिकेतील काळ्या यादीतील कंत्राटदाराकडून पैसे उकळण्याबाबत परब यांच्याकडून आदेश असल्याचं या पत्रात वाजेने लिहिलं होतं. हे पत्र समोर आल्यानंतर विरोधक अनिल परब यांच्या ईडी चौकशीची मागणी करू लागले.
...म्हणून अनिल परब यांना ED ने पाठवली नोटीस
...म्हणून अनिल परब यांना ED ने पाठवली नोटीस SaamTv

मुंबई : राज्यामध्ये एकीकडे भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. जन आशीर्वाद यात्रा सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद रंगला. यानंतर राणेंची अटक आणि जामीनावर सुटका देखील झाली. मात्र, आता या यात्रेची सांगता होत आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस येत आहे. अशी माहिती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे.

हे देखील पहा :

संजय राऊत यांचे ट्विट

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र."

...म्हणून अनिल परब यांना ED ने पाठवली नोटीस
बलात्कार करणाऱ्या नगरसेवक पतीने केला पुन्हा विनयभंग

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी सचिन वाजेने कोर्टात मला काही सांगायचं आहे असे म्हटले होते. त्यावेळी कोर्टाने काय म्हणायचं आहे ते लेखी द्या अशा सूचना दिल्या, त्यावेळी वाजेने पाच पानांचं लेटर लिहून कोर्टात दिलं, मात्र त्यावेळी कोर्टाची प्रोसिजर पूर्ण न केल्यामुळे कोर्टाने ते प्रोसिजर नुसार देण्यास सांगितले आणि ते पत्र पत्रकारांमध्ये वायरल झालं. या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार पासून अनिल परब, अनिल देशमुख खुद्द शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख होता. पालिकेतील काळ्या यादीतील कंत्राटदाराकडून पैसे उकळण्याबाबत परब यांच्याकडून आदेश असल्याचं या पत्रात वाजेने लिहिलं होतं. हे पत्र समोर आल्यानंतर विरोधक अनिल परब यांच्या ईडी चौकशीची मागणी करू लागले.

वाजेने परब यांच्या विषयी पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. परब यांनी त्यांच्या बंगल्यावरून फोन करून सचिन वाजेला महानगरपालिकेतील काळ्या यादीतील ५० कंत्राटदारांची यादी दिली. या कंत्राटदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्याची जबाबदारी वाजेवर सोपवली होती. या वाजेच्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. वाजेच्या या आरोपावरून विरोधकांनी अनिल परब याच्या ईडी चौकशीची मागणी उचलून धरली.

किरीट सोमय्या यांनीही ईडीकडे या संदर्भात पत्र व्यवहार केला होता. आता महाविकास आघाडीतील आणखी एकमंत्री ईडीच्या जाळ्यात अडकल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांमधील धाकधूक वाढलेली आहे. परब यांना बुधवारी चौकशीस हजर राहण्यास ईडीने सांगितले आहेत, आता परब चौकशीला हजर राहतात का ? की देशमुखांप्रमाणे गैरहजर राहतात हे पाहणं महत्वाचं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com