ED raid in Sangli : मुंबईनंतर ईडीने सांगलीकडे मोर्चा वळवला; मोठे मासे गळाला लागणार?

Sangli News : ईडी पथकं शिवाजीनगर मधील सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात गेली आहेत.
ED raid in Sangli : मुंबईनंतर ईडीने सांगलीकडे मोर्चा वळवला; मोठे मासे गळाला लागणार?
Published On

Sangli News : अंमलबजावणी संचालनालयाने म्हमजे दोन दिवस मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात धाडी टाकल्या. मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी हे धाडसत्र होते. या धाडीनंतर मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकरांसह अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

एकीकडे मुंबईतील ईडीच्या कारवाईची चर्चा सुरु असताना आता ईडीने सांगलीत मोर्चा वळवला आहे. सांगली शहरात आज सकाळी ईडीचे दोन पथकं दाखल झाली आहेत. ही पथकं शिवाजीनगर मधील सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात गेली आहेत. (Latest Marathi News)

तेथे ईडीचे अधिकारी काही जणांची चौकशी करत आहेत. सध्या कोणत्याही तपशिल माध्यमांना देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे या धाडीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

ED raid in Sangli : मुंबईनंतर ईडीने सांगलीकडे मोर्चा वळवला; मोठे मासे गळाला लागणार?
Darshana Pawar Death Case : मोबाईल बंद, विविध राज्यात भटकंती... दर्शना पवारचा मारेकरी पोलिसांच्या सापळ्यात कसा अडकला?

पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. त्यांचा शिवाजीनगर परिसरात बंगला आहे. या बंगल्यात आज ईडीचे पथक पहाटेच्या सुमारास चौकशीसाठी आले. सध्या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

ED raid in Sangli : मुंबईनंतर ईडीने सांगलीकडे मोर्चा वळवला; मोठे मासे गळाला लागणार?
BMC Covid Scam : २०० हून अधिक डॉक्टरांच्या बोगस नोंदी, कोट्यवधी उकळले; कोविड सेंटर घोटाळ्याची व्याप्ती वाढली

आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पारेख बंधूंच्या बँक खात्यांचीही चौकशी सुरू आहे. या करावाईबाबत स्थानिक पोलिसांनी सुद्धा येऊन चौकशी करून माहिती घेतलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com