Devendra Fadnavis : 'कंपन्यांकडे नोकऱ्या आहेत, पण...'; देवेंद्र फडणवीस तरुणांच्या रोजगाराच्या समस्येवर स्षष्टच बोलले

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून तिसऱ्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था लवकरच भारत बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
devendra Fadnavis
devendra Fadnavis saam tv

Devendra Fadnavis News : देशात 2014 पूर्वी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकार आल्यानंतर यात देशभरात 80 हजार स्टार्टअप सुरू झालेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून तिसऱ्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था लवकरच भारत बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

तसेच कंपन्यानमध्ये नोकऱ्ऱ्या आहेत, पण कौशल्य युवकांकडे नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपुरात आमदार निवास परिसरात फॉरचून फाऊंडेशनचे युथ एम्पॉवरमेंट समिट कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, 'दरवर्षी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं व्यासपीठ युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून मिळत आहे.यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे, खऱ्या अर्थाने जगातील सर्वाधिक युवकांची लोकसंख्या असलेला भारत देश आहे, कौशल्य विकास आणि रोजगार अर्थव्यवस्थेत महत्वाचा आहे, यातून चालना मिळते'.

devendra Fadnavis
Sharad Pawar : फडणवीसांचं महत्व वाढवायची गरज नाही; शरद पवार यांनी एकाच वाक्यात विषय संपवला!

'2014 पूर्वी जगातील 10 व्या नंबरची अर्थव्यवस्था होती, पण पंतप्रधान मोदी आल्यानंतर जगातील 5 अर्थव्यवस्था झालो आहे. लवकर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत होणार आहे. भारताची अर्थव्यवस्था साडे सात टाक्यांनी वाढत असल्याने अनेक युवकांना रोजगार संधी उपलब्ध होत आहे. यंदाचा बजेटमध्ये 10 लाख कोटींची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केल्याने लाखोंना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे फडणवीस पुढे म्हणाले.

'पूर्वी बोटावर मोजणारे स्टार्टअप होते. आज 80 हजार स्टार्टअप देशात सुरू आहे. रोजगार निर्मिती वाढली आहे, युवाचा कल्पना शक्तींना बळ मिळत आहे. टियर 2 सिटीत राहणाऱ्या अनेक तरुणांना त्यांना कुठलाही उद्योजक करण्याची पार्श्वभूमी नसताना ही संधी उपलब्ध झाली आहे. पावडर व्यवसाय करणारा ही मशीनरी नागपूरच्या एका स्टार्टअप मध्ये तयार होत असल्यानं परदेशात जाणारा चलन आता देशाची अर्थव्यवस्था भक्कम करत आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले.

devendra Fadnavis
Sanjay Shirsat : पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यात राऊतांचा मोठा वाटा; शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट

'कंपन्यानमध्ये नोकऱ्या (Jobs) आहेत, पण कौशल्य युवकांकडे नाही, यात कंपनी आणि नोकऱ्या शोधणाऱ्या एकत्र आणून त्यांना फायदा या समिट मधून होत आहे. 2014 पूर्वी एपीएफओ हे खाते 5 कोटी होते. आज 27 कोटी खाते असल्यानं, नवीन लोकांना यात संधी मिळाल्याचं हे वास्तव आहे. सरकारची पूर्णपणे मदत या समिटला होत राहील. संधी घ्या आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच व्हा, यासाठी बळ देण्याच काम युथ एम्पॉवरमेंट आणि सरकार करेल, असेही फडणवीस म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com