Dussehra Melava 2024 Live Updates : धारावीच्या माध्यमातून मुंबई लुटत आहे - ठाकरे

Dussehra Melava 2024 Live Updates: आज शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ आज दसरा सण आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा, शिंदे गटाचा दसरा मेळावा आणि मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पावसासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

धारावीच्या माध्यमातून मुंबई लुटत आहे - ठाकरे

धारावीच्या माध्यमातून मुंबई लुटत आहे. अदांनीना काय दिले नाही.. चंद्रपूरमधील शाळा, धारावी, विमानतळ, मीठाघर, मुलुंड टोलनाका.. खूप काही दिले. आज जे आम्ही त्वाषाने लढतोय. संयुत्त महाराष्ट्रासाठी दिला.. मुंबई विकली जात असताना आम्ही का शांत राहायाचं.. मी मुंबईसाठी लढतोय, महाराष्ट्रासाठी लढतोय. माझ्यासाठी लढत नाही. सगळेच त्यांच्यासोबत असले.. तरी मी लढणार.. तुम्ही सोबत असल्यानंतर लढायचं नाही.. महाराष्ट्र लुटणाऱ्याचा मी शत्रू आहेच.

शिंदे, अजित पवार यांनी भाजपची एक्सपायरी ठरवली आहे.

अमित शाहजी तुमच्या भाजपला दाढीवाला खोडकिडा लागलाय, जॅकेटवाली गुलाबी आळी लागली. ती पाहा.. ऐकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. पण यांचा सत्ता जिहाद सुरु आहे. काही झाले तर यांना सत्ता हवी आहे. कुणीही येतो सत्ता हवा आहे.

हिऱ्यापोठी जन्माला आलेल्या गोरगोट्यांना लाज वाटतेय. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कऱणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. म्हणून आझाद शिवसेनाचा आझाद मेळावा आहे. ः शिंदे

आदित्य ठाकरे आपण शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात पहिलं भाषण केलं. शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे, असे मी मानतो. - संजय राऊत

आमचं सरकार आल्यानंतर सगळ्यांच्या फाइली निघणार, एकालाही सोडणार नाही. महाराष्ट्रासोबत बेमाईमानी करणाऱ्यांना सोडणार नाही. - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

जोपर्यंत‌ अदानींची‌ कामं होत‌ ‌नाही. तोपर्यंत आचारसंचिता लागणार नाही, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

महाराष्ट्राची लूट रोखण्यासाठी ही लढाई आहे. नुसता भ्रष्टाचार हे सरकार करतेय.

मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला

दोन वर्षे आपण ज्याची वाट पाहत होतो. राज्याची निवडणूक कधी लागणार.. त्याची वाट पाहत होतो. तो क्षण आलाय - आदित्य ठाकरे

भास्कर जाधव यांच्याकडून अमित शाह यांचा अफजल खान असा उल्लेख

भाऊ पक्के लबाड आहेत - भास्कार जाधव

महिला भगिणींना १५०० मिळाले, फार काही चिंता करायची गरज नाही. २०१४ मध्ये १५ लाख देणार होते... काय झालं त्याचं... भाऊ पक्के लबाड आहेत... भास्कर जाधवांचा हल्लाबोल

भास्कर जाधव यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

राज्यात आलेलं सरकार विश्वासघातकी आहे. हे विश्वासघातकी सरकार सर्वांचा विश्वासघात करणार.. मराठ्यांचे आरक्षणाचे काय झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन टिकणारे आरक्षण देऊ असे म्हणाले होते. त्याचं काय झालं. दोन दिवसात आचारसंहिता लागेल.. कधी देणार हे आरक्षण.. असा सवाल भास्कार जाधव यांनी केला.

शिंदे सेनेचा मेळावा सुरू होण्याच्या आधीच शिवसैनिक मैदान सोडून निघाले. शिवसैनिकांच्या बाहेर जाऊ नये, म्हणून गेट बंद करण्यात आले. त्यामुळे शिवसैनिक दुसऱ्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

सरसंघचालकांनी सांगितलं द्वेष संपला पाहिजे, पण.., सुषमा अंधारेंची संघावरही टीका

सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा झाला. सरसंघचालकांनी सांगितलं द्वेष संपला ‌पाहिजे, पण ते‌ सांगता कुणाला. कारण राज्यात सर्व गुन्यागोविंदानं नांदत आहे. हा सल्ला फडणवीसांना सरसंघचालकांना द्यावा. त्यांनी माणसात माणसात वाद लावलेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

उद्या माझी राजकीय भूमिका ठरवणार, काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर सुलभा खोडके यांची प्रतिक्रिया

काँग्रेस मधून निलंबित केल्यानंतर आमदार सुलभा खोडके यांची प्रतिक्रिया

2019 मध्ये काँग्रेस पक्षाने माझ्या वर विश्वास ठेवला त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विशेष आभार मानतो

अजित पवार मला भरपूर निधी दिला त्यामुळे मी अजित पवार यांचा अमरावतीत सत्कार करणार आहे

उद्या माझी राजकीय भूमिका ठरवणार आहे-सुलभा खोडके

मला काँग्रेसच्या बैठकीत बोलावलं गेलं नाही सातत्याने मला डावलला स्थानिक काँग्रेस नेते नाना पटोले यांचे कान भरत होते

उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर मी जाणार आहे

शिंदेंच्या दसरा मेळाव्यात कोण कोण बोलणार याची उत्सुकता

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात संजय राऊत, सुषमा अंधारे असे नेते ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात भाषण करणार असताना शिंदेंकडे देखील मोठे नेते शाब्दिक हल्ला करण्यास सज्ज.ज्येष्ठ नेते रामदास कदम, मंत्री गुलाबराव पाटील आणि महिला नेत्या ज्योती वाघमारे भाषण करण्यास उतरणार अशी सूत्रांची माहिती. खासदार नरेश म्हस्के या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहेत.

Dasara Melava : कल्याण रेल्वे स्थानकावर शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने

कल्याण रेल्वे स्थानकावर शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले.मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मेळावे होत असल्याने, मेळाव्यासाठी निघालेले दोन्ही गटाचे कार्यकर्ते कल्याण रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले.दोन्ही गट आमने सामने आल्याने दोन्ही गटांकडून स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर आधी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आधी निघून गेले, त्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते गेले.

Dasara Melava : छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून शस्त्र पूजन

आज विजयादशमीच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन केल्या जाते. घरातील सर्व शस्त्र वाहन आणि घरांची पूजा केली जाते. त्यासोबतच घरात असलेल्या सर्व वस्तूंचे पूजन आज होते. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी देखील आपल्या सर्व शस्त्रांची विधिवत पूजा केली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हातून शस्त्रपूजा करण्यात आली.

Mumbai Rain Update : मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावरही पावसाचं सावट आहे. आझाद मैदान परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

Sulbha Khodke News : काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचं ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन

काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचं ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. पक्ष विरोधी कारवाई केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाई केली आहे.

Dasara Melava : पुण्यातील शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले 

पुण्यातून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यातील शिवसैनिक आझाद मैदानावरील मेळाव्याला उपस्थितीत राहणार आहेत.

Manoj Jarange Patil: 'सरकारने एकही मागणी मान्य केली नाही', जरांगे पाटील संतापले

अन्यायाविरोधात मी एक शब्द बोलणार..तुमच्यासाठी ते सर्वस्व आहे. तुम्ही ओळखून घ्यायचं..

अन्याया विरोधात लढायचं हिंदू धर्माने शिकवलेय. अन्याय सहन करायचं नाही. न्यायासाठी उठाव करायचं शिकवलेय. आज १४ महिने झालं, उठाव सुरु आहे. सरकारकडे अन्याया विरोधात मागणी आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या..इथं जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्याच्या आणि केंद्राची सुविधा घेतली. हा जातीवाद नाही. अन्याया विरोधात उठाव आहे. आरक्षणासाठी आम्ही झुंज देत आहे.

Manoj Jarange Patil Speech: एवढी गर्दी पहिल्यांदाच पाहिली: मनोज जरांगे पाटील

जमलेल्या विराटा समुदायाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. इतका जनसमुदाय जमेल असं वाटलं नव्हतं. नजेर पुरेल, इथंपर्यंत तुम्हा याल, असं मला वाटलं नव्हतं.

बीडच्या पाठीमागे सर्व रस्ते जाम आहेत. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी आहे.

आपण या ताकदीने एकत्र याल, असे कधी वाटलं नव्हतं. हा जनसमुदाय न्यायाचा आहे.

एका दुखाकडून या जनसमुदायाला सुखाकडे जायचं आहे

या समुदायावर संस्कार आहेत. ते संस्कार कधीच जादीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय, या राज्यावर समुद्रासारखा पसरलाय. पण मस्तीत वागला नाही.

प्रत्येकाला सांभाळण्याचं प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायाने केलेय. त्यांनी कधी जादीवाद केला नाही. जात यांना कधी शिवली नाही.

[1:29 pm, 12/10/2024] Namdeo Kumbhar Sir: इतके लोकं मी पहिल्यांदाच पाहिलेत. मला काही बोलायचं सुचत नाही. इतकं उंच व्यासपीठ असतानाही नजर पुरेल तिकडे मराठा दिसत आहे. तुम्ही साथ द्यायचं ठरवलं, तर देतात, नाही म्हटले तर त्याचं काही खरं नाही.

आपण बोलत नाही. बोलतही नाही. मी मर्यादा पाळणारा आहे. आपल्यावर संस्कार आहेत, ते कधीच विसरणार नाही. जातीवाद न करण्याची शिकवण नारायण गडाने दिली आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण या गडाने दिली आहे. या गडाची किमया आणि आर्शीवाद, ज्याच्या पाठीवर पडतो, तो

Nashik News: ठाकरेंच्या मेळाव्यासाठी नाशिकमधून शिवसैनिक मुंबईकडे रवाना 

ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडत आहे उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोनं लुटण्यासाठी नाशिकमधून मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला मोठे महत्त्व आहे उद्धव ठाकरे हे कोणावर टीका करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान नाशिक मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत मुंबईकडे कूच केली आहे खरे शिवसैनिक हे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठीच येतील अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे

Buldhana News: रात्रीच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल

एकीकडे राज्यात दसरा साजरा केल्या जात आहे, राजकीय नेते स्वतःच्या खेळ्या खेळताना दिसत आहे.. तर दुसरीकडे परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची दैनवस्था झाली आहे .. संपूर्ण राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.. बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार केला आहे.. मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालंय.. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे , असंख्य शेतातील विहिरि खचल्या आहेत.. मका, सोयाबीन कापूस व तूर ही पिके पाण्याखाली गेली आहे.. ही माहिती मिळताच काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी मोताळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सरकार कडे केली आहे..

Beed News: पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल

पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल

भगवान भक्ती गडावरील हेलिपॅड वर पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे यांची होणार हेलिकॉप्टर मधून एन्ट्री

हेलिपॅड पासून मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत निघणार मिरवणूक

काही वेळात पंकजा मुंडे होणार दसरा मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रम स्थळी दाखल

Chhatrapati Sambhajinagar News: संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिप केली बंद; उच्च न्यायालयाची बार्टीला नोटीस

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशीप बंद केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आता बार्टीचे संचालक आणि कुलगुरूंना नोटीस बजावलीय. शिवाय सुनावणी पर्यंत याचिका करता विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये असे आदेशही विद्यापीठ प्रशासनाला दिले. सन 2019-20 या वर्षासाठी एम फिल मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत अधिछात्रवृत्ती मंजूर झाली होती. परंतु 2023 मध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर कोणत्या कारणाशिवाय पी.एच.डी साठी सुरू राहणारी फेलोशिप बार्टीने रद्द केली होती. त्यानंतर बार्टीने फेलोशिप दिली नाही तर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येईल असे परिपत्रक विद्यापीठाने काढले होते. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 ऑक्टोबरला होणार असून तोपर्यंत संशोधक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नयेत असे आदेश खंडपीठाने विद्यापीठ प्रशासनाला दिले.

Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमगार्ड्सना दसऱ्याचे गिफ्ट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमगार्ड्सना दसऱ्याचे गिफ्ट

राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर

होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन आता महाराष्ट्रात मिळणार

होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिवस ५७० रुपयांवरून १ हजार ०८३ रुपये

गेल्याच महिन्यात ११ हजार २०७ होमगार्ड्सची भरती

प्रशिक्षणार्थी होमगार्ड्सना दसऱ्याची मोठी भेट

एकूण ५५ हजार होमगार्ड्सना मिळणार लाभ

Mumbai News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संघाच्या शाखेत सामील

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संघाच्या शाखेत सामील

विजयादशमीनिमित्त पथसंचलनात नार्वेकर झाले सामील

कुलाबा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नार्वेकरांनी लावली हजेरी

नार्वेकर यांच्या सोबतच माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर ही उपस्थित

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, नागरिकांनी केला रास्तारोको

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

संगमनेर तालुक्यातील काल संध्याकाळची घटना

खराडी गावातील महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

परीसरातील नागरीक आक्रमक

नागरीकांनी केला रास्तारोको

Pune News: महिलांना आणि मुलींना ४ तासांचे जॅाब क्रीअट करणार - चंद्रकांत पाटील

- महिलांना आणि मुलींना चार तासांचे जॅाब क्रीअट करणार -

- ⁠सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर एक हजार जॅाब तयार करणार.

- ⁠उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

- ⁠चार तासांच्या जॅाबसाठी ११ हजार रुपये वेतन देणार

- ⁠टाटा समुहाकडून काही महिलांना चार तासांच्या जॅाबसाठी संधी

- ⁠महिलांना दुपारच्या वेळेत हा जॅाब करता येणार.

- या जॅाबसाठी महिलांना मोफत प्रवास उपलब्ध असणार

- ⁠भविष्यात अशा प्रकारच्या जॅाबची संख्या वाढवणार त्यासाठी जाहिराती काढणार आणि मुलाखती घेणार

Beed News: मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रतील जनतेला दिल्या विजयादशमीच्या शुभेच्छा

मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रतील जनतेला दिल्या विजयादशमीच्या शुभेच्छा.

जे काही बोलायचं ते तिथून बोलीन. सर्वांनी शांततेत यावं आणि जावं कुणी काही केल्याने आपापली एकजूट कमी होत नाही.

राज्यातील जनता साडेबारा पर्यंत गडावर पोहचेल आणि साडेबारा वाजता मी कार्यक्रम सुरू करीन.

जे बोलायचं तिथून बोलेन तिथे किती लोक येतील हे सांगता येणार नाही मोजणारे मोजतील

Beed News: मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी मराठा बांधव नारायणगडावर दाखल

मनोज जरांगे पाटील यांचा आज दसरा मेळावा

दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव नारायणगडावर दाखल

मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com