Pandharpur Khillar Bazar: माघी यात्रेच्या खिलार जनावर बाजारावर दुष्काळाचे सावट; जनावरांची मागणी घटली

Khillar Bail Bazar : माघी यात्रेच्या निमित्ताने वाखरी येथे खिलार जनावरांचा बाजार भरलाय. हजारो जनावरे पंढरीनगरीत दाखल झाली आहेत. येथील वाखरी पालखी तळावर हा बाजार भरलाय. यामध्ये खिलार जनावरे, पंढरपुरी म्हैस, जर्सी जनावरांचा समावेश आहे.
Pandharpur Maghi Khillar Bail Bazar
Pandharpur Maghi Khillar Bail BazarSaam Tv
Published On

भारत नागने, पंढरपूर

Pandharpur Maghi Khillar Bail Bazar:

पंढरपूर येथील प्रसिद्ध असलेल्या माघी खिलार जनावरांच्या बाजारावर यंदा दुष्काळाचे सावट निर्माण झालंय. जनावरांना मागणी कमी असल्याने खिलार बैल व खोंडांचे भाव निम्म्यावर आले आहेत. माघी यात्रेच्या निमित्ताने वाखरी येथे खिलार जनावरांचा बाजार भरलाय. बाजारात राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने खिलार बैल, खोंड आदींसह इतर जनावरे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. (Latest News)

हजारो जनावरे पंढरीनगरीत दाखल झाली आहेत. येथील वाखरी पालखी तळावर हा बाजार भरलाय. यामध्ये खिलार जनावरे, पंढरपुरी म्हैस, जर्सी जनावरांचा समावेश आहे. दरम्यान यंदा राज्यभरात दुष्काळाचे सावट असल्याने चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या बाजारात मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी आली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur maghi Khillar Bail Bazar
Pandharpur maghi Khillar Bail Bazar

खिलार जनावरांच्या खरेदी - विक्रीसाठी येथील बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथील बाजारात मराठवाड्यासह कर्नाटकातून देखील मोठ्या संख्येने खिलार जनावरे विक्रीसाठी आली आहेत. सध्या बाजारात जवळपास पाच हजाराहून अधिक जनावरे विक्रीसाठी दाखल झाली आहेत.

Pandharpur maghi Khillar Bail Bazar
Pandharpur maghi Khillar Bail Bazar

दोन दिवसांमध्ये फक्त १० ते १५ टक्के जनावरांची खरेदी- विक्री झालीय. मागणी कमी असल्याने जनावरांचे दर देखील घसरले आहेत. एक लाख रुपये किमतीच्या बैलाला ५० हजार रुपयांना मागणी होत आहे. तर खोंडांच्याही किंमती ही निम्याने खाली आल्या आहेत. किंमती कमी झाल्याने पशू पालक शेतकरी अडचणीत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com