Accident News : बर्डीपाडा फाट्याजवळ भीषण अपघात; विसरवाडी पाेलीस घटनास्थळी दाखल

विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.
Accident
AccidentSaam tv

Nandurbar News : गुजरात राज्यातून धुळे नागपूरकडे जाणा-या टेम्पोचा बर्डीपाडा फाट्याजवळ भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातग्रस्त वाहनातील चालकास (driver) तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी : गुजरात राज्यातून धुळे नागपूरकडे जाणारा टेम्पो प्लास्टिक मालने भरलेला हाेता. बर्डीपाडा फाट्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या टोलनाकाच्या दरम्यान वनवेने वाहनांची ये जा सुरू आहे. हा टेम्पो सरळ मार्गाने जाताना रेती कपचीच्या ढिगार्‍यावर चढल्याने अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पलटी होत भीषण अपघात झाला आहे असं सांगितले जात आहे.

Accident
Jiwati : १५ सप्टेंबर पासून सीमावर्ती गावात जमीन मोजणीस प्रारंंभ हाेणार : आमदार सुभाष धोटे

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. वाहनातील प्लास्टिक मालही बाहेर फेकला गेल्याने मालाचे व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विसरवाडी पोलीस व १०८ रुग्णवाहिकेला फोन करून तत्काळ टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्या आलं.

त्यानंतर चालकास पुढील उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं. विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी बेजबाबदारपणा दिसून येत असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com