Dr. Shirish Case: डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाची दुसरी बाजू येणार समोर; आरोपी मनीषा मानेच्या पोलीस कोठडीत वाढ

Dr. Valsangkar Death Case: हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून आरोपी मनीषा माने हिच्या विरोधात आणखी 27 तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर न्यायालयाने मानेच्या पोलीस कोठडीत वाढ केली.
 Dr. Valsangkar Case:
Dr. Valsangkar Death CaseSaam Tv
Published On

सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. आरोपी मनिषा माने हिच्या पोलीस कोठडी वाढ करण्यात आलीय. आता या प्रकरणाची दुसरी बाजू लवकरच सर्वांसमोर येईल. डॉक्टर वळसंगकर प्रकरणी सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयाने २० तारखेला आरोपी मनिषा मानेला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती.

आज पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा न्यायलायात मनिषा मानेला हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपी मनिषा मानेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आलीय. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून आरोपी मनीषा माने हिच्या विरोधात आणखी 27 तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्यामुळे या तक्रारींची तपासणी करण्यासाठी अधिक तपास करणेकामी पोलीस कोठडी वाढवलीय.

पोलीस कोठडीत मनिषा मानेची पुन्हा चौकशी केली जाणार आहे, त्यामुळे वळसंगकर आत्महत्या प्रकरणी दुसरी बाजू देखील समोर येणार आहे.

मुलगा - सुनेच्या जबाबातून सगळी माहिती उघड

वळसंगकर यांच्या मुलाचा आणि सुनेचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या हॉस्पिटलची पूर्ण सुत्रे मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती. तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार हा प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळे-माने या बघत असल्याची माहिती समोर आलीय.

 Dr. Valsangkar Case:
Dr. Shirish Valsangkar : ज्याला शिकवून अधिकारी केलं...; डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोटवर अन् रिमांड मजकूरमध्ये काय काय नमूद?

हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभारामुळे डॉ.आश्विन आणि डॉ. सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढलेला होता. त्यामुळे २०२५ साली डॉ. शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र स्वतःकडे घेतली होती. तेव्हा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहारच्या तक्रारी डॉ. वळसंगकर यांच्याकडे आल्या होत्या.

 Dr. Valsangkar Case:
Dr. Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरण; शेवटच्या चिठ्ठीत उल्लेख केलेल्या 'त्या' महिलेला कोर्टाचा दणका

आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आरोपी महिलेने एक मेल डॉ. शिरीष वळसंगकर यांना केला होता. त्यात आपला पगार कपात केली जातेय. काही व्यक्तींचा ऐकून त्याच्यावर आरोप केले जातात, अधिकार कमी केले जात आहेत. याबाबत तिने तक्रार केली होती'. 'या मेलच्या अनुषंगाने डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी तिला बोलावलं. त्यावेळी महिलेने मेल करून चूक झाल्याची कबुली दिली. त्यावेळी माफी देखील मागितली होती, असा खुलासा मागील सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलाने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com