सातारा : सातारा नगरपालिकेच्यावतीने संपूर्ण देशभरात अलौकीक कार्य करत असलेल्या व्यक्तींना डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) स्मृती सामाजिक पुरस्काराने गौरवले जाते. यावर्षी ‘नाम’ फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सातार्याच्या शाहू कलामंदिरात अत्यंत देखण्या सोहळ्यात सातारकरांच्या साक्षीने नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार देण्याची सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची इच्छा होती.
हे देखील पहा :
मात्र, कोरोनाचे निर्बंध सातारा (Satara) जिल्ह्यात लादले गेल्याने 50 माणसांच्या उपस्थितीतच कोणताही कार्यक्रम घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. नाना पाटेकर (Nana Patekar) व मकरंद अनासपुरे हे दोघेही खास सेलिब्रेटी असल्याने कोरोनाचा धोकाही गर्दीमुळे वाढणार हे लक्षात घेऊन उदयनराजे भोसले व नगरपालिकेचे प्रशासक अभिजीत बापट यांच्यामध्ये चर्चा झाली आणि पुरस्कार निवड समितीच्या उपस्थितीत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय झाला.
उदयनराजे यांनी स्वत: नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांना फोन करुन नाम फौंडेशनच्या (Naam Foundation) पुण्यातील कार्यालयात पुरस्कार निवड समितीच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली. त्यानुसार शुक्रवारी नाम फौंडेशनच्या कार्यालयात अवघ्या 15 लोकांच्या उपस्थितीत पुरस्कार निवड समितीच्यावतीने, सातारा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या हस्ते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सातारी कंदी पेढे, मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.