यवतमाळ मधील डॉक्टरने रुग्णालयातच केला महिलेवर बलात्कार
यवतमाळ मधील डॉक्टरने रुग्णालयातच केला महिलेवर बलात्कारSaam Tv

यवतमाळ मधील डॉक्टरने रुग्णालयातच केला महिलेवर बलात्कार

यवतमाळ येथील उमरसरा परिसरातील छत्रपती सोसायटीमध्ये निसर्गोपचार केंद्र चालविणाऱ्या एका डॉक्टरने महिलेवर बलात्कार केले आहे.

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) येथील उमरसरा (Umarsara) परिसरातील छत्रपती सोसायटीमध्ये निसर्गोपचार केंद्र चालविणाऱ्या एका डॉक्टरने महिलेवर बलात्कार (abuse) केले आहे. उपचाराकरिता आलेल्या महिलेचा अश्लील व्हिडिओ (Video) बनवून नंतर तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अवधूतवाडी (Avadhutwadi) पोलिसांनी (police) डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक (Arrested)करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

गणेश मुरलीधर साठे (वय- ३५, रा. छत्रपती सोसायटी, तीन फोटो चौक, जुना उमरसरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे (accused) नाव आहे. मधुमेहाचा त्रास असल्याने पीडित महिला २०१७ मध्ये डॉ. गणेश साठे याच्या नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये गेली होती. तेव्हा तिला सलग १२ महिने उपचार घेतल्यानंतरच आराम मिळेल, असे सांगण्यात आले होते. ती उपचारासाठी या क्लिनिकमध्ये जाऊ लागली. तेथे तिला डॉ. साठे याची पत्नी (Wife) गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करत होती.

त्या अवस्थेमध्ये साठे याने वारंवार तिच्यावर बलात्कार केला आहे. इतकेच नाही तर त्याने याचे व्हिडिओ देखील काढले आहे. नंतर या व्हिडिओच्या आधारे डॉ. साठे हा सातत्याने शोषण करू लागला होता. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून शोषण केल्याचा आरोप महिलेने यावेळी केला आहे. इतकेच नव्हे तर डॉक्टरच्या या कृत्यात त्याची पत्नीही त्याला मदत करत असल्याचा आरोप पीडितीने केला आहे.

यवतमाळ मधील डॉक्टरने रुग्णालयातच केला महिलेवर बलात्कार
आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

तिच्या या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी डॉ. गणेश साठे याच्याविरुद्ध कलम ३७७, ३७६ (२) (न), ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टरला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे. पुढील या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

पीडित महिलेविरोधात डॉ. गणेश साठे याच्या पत्नीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात ६ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेविरोधात कलम ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा केला होता. साठे यांनीसुद्धा महि लेविरोधात तक्रार अर्ज २७ डिसेंबर रोजी दिला आहे. त्यात महिला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचे नमूद केले.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com