'महाज्योती' कडून ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

तसेच जेईई, नीट परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी टॅबचा वापर विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
'महाज्योती' कडून ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थ्यांना टॅब चे वितरण
'महाज्योती' कडून ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थ्यांना टॅब चे वितरणसंजय डाफ
Published On

नागपूर - महाज्योती कडून ओबीसी, आणि व्हीजेएनटीच्या जेईई, नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांना या टॅबचा मोठा फायदा होणार आहे. आजपासून टॅब वितरण सुरु झालं असून राज्यातील सहा हजार विद्यार्थ्यांना टॅब दिला जाणार, अशी माहिती महाज्योतीचे अध्यक्ष आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच जेईई, नीट परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी टॅबचा वापर विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

महाज्योती संस्था ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहील. पुढील काळात UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील टॅब दिला जाणार आहे. या टॅबमध्ये सीमकार्ड देखी आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले. टॅब मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. टॅब मिळाल्यामुळे अभ्यास करणे सोपे होईल, मोबाईलपेक्षा टॅबची स्क्रीन मोठी असल्याने अभ्यास करण्यास मदत होणार, अशा भावना विद्यार्थ्यांना व्यक्त केल्या आहेत.

हे देखील पहा -

राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’तर्फे विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पीएचडीपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. आता महाज्योतीच्या वतीने ओबीसी , भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE, NEET आणि CET परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअर आणि मेडिकलसाठी तयारी करायची असते.

'महाज्योती' कडून ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थ्यांना टॅब चे वितरण
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिक्षिका पहिल्याच दिवशी 'अनुपस्थित'

मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन दिले जाणार आहे. 2023 मध्ये होणाऱ्या JEE, NEET आणि CET परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी यावर्षी विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण केलेली हवी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. शहरी विभागात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 70 टक्के तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण असणे आवश्यक आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com