धक्कादायक! पीएम किसान योजनेद्वारे अपात्र शेतकऱ्यांना 359 कोटींचे वाटप

राज्यातील 4 लाख 46 हजार 512 अपात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून आत्तापर्यंत 359 कोटी रुपये मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धक्कादायक! पीएम किसान योजनेद्वारे अपात्र शेतकऱ्यांना 359 कोटींचे वाटप
धक्कादायक! पीएम किसान योजनेद्वारे अपात्र शेतकऱ्यांना 359 कोटींचे वाटपSaamTV
Published On

पुणे : राज्यातील 4 लाख 46 हजार 512 अपात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून आत्तापर्यंत 359 कोटी रुपये मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, यामध्ये 2 लाख 50 हजार इन्कम टॅक्स भरणारे तर एक लाख 95 हजार 625 वेगवेगळ्या कारणाने अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेन केली आहे.Distribution of money to ineligible farmers through PM Kisan Yojana

हे देखील पहा-

2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Nanendra Modi यांनी देशभरातील शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनाPM Kisan Yojana सुरू केली खरी पण या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यालाEvery Farmer वर्षाला तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपये दिले जातात. केंद्र सरकारनेCentral Goverment या योजनेअंतर्गत आजपर्यंत दिलेही आहेत. केंद्राने नुकताच 9 वा हप्ता 9 ऑगस्ट 2021 ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजवर दीड लाख कोटी रुपये जमा केलेत. सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांसह कर भरणाराTax अपात्र शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतल्याचा तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने आधारAdhar Card आणि सार्वजनिक वित्त व्यवस्थापनच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे यात दोषीवर कारवाई करण्यात यावी व पैसे वसूल करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी संघटनेन केली आहे.

धक्कादायक! पीएम किसान योजनेद्वारे अपात्र शेतकऱ्यांना 359 कोटींचे वाटप
सगळीकडे फक्त मोदींचे फोटो आणि बॅनर आहेत; लस मात्र नाही - भाई जगताप

महाराष्ट्रातील दोन लाख 50 हजार 887 टॅक्स भरणारे तर एक लाख 95 हजार 625 वेगवेगळ्या कारणाने अपात्र ठरले असे एकूण चार लाख 46 हजार 512 शेतकरी अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात केंद्राने आजवर 359 कोटी रुपये जमा केले आहेत ज्यांच्या नावावर जमीन आहे अशा सरकारी नोकरदार वेगवेगळ्या व्यवसायातून टॅक्स भरणारे आहेत त्यांची संख्या अडीच लाखाहून अधिक असून त्यांच्याकडून सुमारे 222 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत यामध्ये अपात्र ठरलेल्या कडून 71 कोटी रुपये वसूल केले आहेत तरी इतर अपात्र ठरल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख 95 हजार 625 इतकी असून त्यांच्या खात्यावर 137 कोटी रुपये जमा झाले आहेत त्यातील 14 कोटी रुपये वसूल करण्यात आले असून उर्वरित यांना नोटिसा काढल्या असून रक्कम वसूल करण्याचे काम सध्या केले जात आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com