नगर तालुका : नगर तालुका दूध संघाच्या संचालक मंडळावर ८ कोटी ३० लाख रूपयांच्या आर्थिक अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. तो गैरव्यवहार दाबण्यासाठीच हे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची साथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले.
आर्थिक अडचणीत असतानाही या संचालकांनी दूध संघातर्फे ५ लाख ११ हजार रूपयांची देणगी भाळवणी (ता. पारनेर) येथील कोविड सेंटरला दिली. त्या बदल्यात आमदार नीलेश लंके यांनी या भ्रष्टाचारी संचालकांची पाठराखण सुरू केली, असा आरोप दूध संघाचे कर्मचारी तायगा शिंदे व गजानान खरपुडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. Director of Nagar Dudh Taluka Sangh joins NCP to suppress scam abn79
शिंदे म्हणाले, की नगर तालुका दूध संघ हा भ्रष्टाचाराचा अड्डाच आहे. सन २००५ ते ०७ या कालावधीत तत्कालीन संचालकांवर २ कोटींचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. जिल्हा दूध संघाची जागा विकून तालुका संघाच्या वाट्याला ८ कोटी रूपये आले होते. पण आर्थिक ताळेबंदात अनेक घोटाळे असल्याचे चौकशी समितीच्या लक्षात आले.
संचालकांनी २३ लाखांचा अॅडव्हान्स घेतला
चौकशी अधिकारी एन. डी. गोधेकर यांनी मार्च २०२१ ला विद्यमान संचालक मंडळाविरोधात ८ कोटी ३० लाख रूपयांच्या आर्थिक अनियमिततेचा गुन्हा दाखल केला. केवळ राजकीय पाठबळामुळे त्या संचालकांना अद्यापि अटक झाली नाही. विद्यमान संचालक मंडळाने एमआयडीसीतील इमारत दुरूस्तीच्या नावाखाली २५ ते ३० लाखांचा, मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली ५ लाखाचा गैरव्यवहार केला.
संचालक मंडळातील किसन बेरड, कैलास मते, वैशाली मते, मोहन तवले, राजाराम धामणे, पुष्पा कोठुळे, भाऊसाहेब काले, बजरंग पडळकर, यांनी ॲडव्हासच्या नावाखाली २३ लाख रूपये घेऊन अपहार केल्याचेही चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. न्यायालयाने २७३ कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत सूचना दिल्या असतानाही संचालक मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले.
पस्तीस लाखांचा टॅंकर घोटाळा
तालुका संघाकडे अवघे दीड हजार लिटर दूध संकलन आहे. ते दूध शितकरण करण्यासाटी जेव्हढी वीज लागते तिच्या कितीतरी पट अधिक वीजबिल तालुका दूध संघ आज भरीत आहे. त्या ठिकाणी आजपर्यंत खाजगी दूध संघाचे साडेचारशे ते पाचशे टॅंकर दूध शीतकरण झाले. त्या बदल्यात ३५ लाख रूपये अवैधरित्या गोळा केले. वीज बिलाचा भूर्दंड मात्र तासुका दुध संघाच्या माथी मारला आहे.Director of Nagar Dudh Taluka Sangh joins NCP to suppress scam abn79
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.