उड्डाणपुलासाठी दिलीप गांधींचाच पाठपुरावा - गडकरी

नगर ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार (कै.) दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली.
नगर ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार (कै.) दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली.

अहमदनगर ः माझे स्नेही असलेले स्व.दिलीप गांधी यांनी खूप मोठे विकासकामे केली. विशेषतः नगरच्या उड्डाणपुलासाठी व रस्त्यांच्या कामासाठी त्यांचा वारंवार पाठपुरावा माझ्याकडे होता. त्यांनी सुचवलेले सर्व कामे मी पूर्ण करून त्यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. हा विकास पाहण्यास ते आपल्यात नाहीत. जेवणाचे पूर्ण ताट वाढून तयार आहे पण ते नाही, याचे मला दु:ख होत आहे. गांधी परिवाराच्या व सुवेंद्रच्या मी कायम पाठीशी असेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.Dilip Gandhi's pursuit for flyover - Gadkari

नगर ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार (कै.) दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली.
साखरेऐवजी कारखान्यांनी आता इथेनॉल तयार करावं - मंत्री गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज नगरला आले असता त्यांनी स्व.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जावून गांधी परिवाराची भेट घेतली. स्व.गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. श्रीमती सरोज गांधी, देवेंद्र गांधी, सुवेन्द्र गांधी व स्वानंद नवसारीकार यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अमर रहे अमर रहे दिलीप गांधी अमर रहे... अशा घोषण यावेळी उपस्थितांनी दिल्या.

श्रीमती सरोज गांधी म्हणाल्या, दिलीप गांधी यांना नितीन गडकरी यांनी आयुष्यभर साथ दिली. त्यांच्या प्रत्येक कामात सहकार्य केले. याबद्दल आभार मानते. Dilip Gandhi's pursuit for flyover - Gadkari

गांधींना हवाय महापालिकेपर्यंत उड्डाणपूल

सुवेन्द्र गांधी यांनी मंत्री गडकरी यांना निवेदन दिले, ते म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपूल व जिल्ह्यातील विकासाचे स्वप्न माझ्या वडिलांनी पहिले आहे. त्यांनी सुचवलेला उड्डाणपूल आपल्यामुळेच पूर्ण होत आहे. मात्र स्व.दिलीप गांधी यांनी सुचवल्याप्रमाणे हा उड्डाणपूल महानगरपालिका कार्यालयापर्यंत होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण विषेश निधी मंजूर करावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com