आघाडी सरकारमधील शाब्दिक चकमकीवर अनिल गोटेंचे पत्र; विरोधकांसह सत्‍ताधारींवर निशाणा

आघाडी सरकारमधील शाब्दिक चकमकीवर अनिल गोटेंचे पत्र; विरोधकांसह सत्‍ताधारींवर निशाणा
Anil gote
Anil gote

भूषण अहिरे

धुळे : राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते टोलेबाजी करत आहेत. यातच धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी पत्रक काढून महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांतील वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करणाऱ्या नेत्यांची कानउघाडणी केली आहे. (dhule-political-news-anil-gote-social-media-lateer-viral-and-maha-vikas-aaghadi-goverment-leader)

महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये दुधपुर सुरू असल्याचे उघडपणे दिसून येत आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याबाबत व काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांबाबत ज्या पद्धतीने टोलेबाजी करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या व महाविकास आघाडी पक्षातील इतर नेत्यांच्या तोंडून देखील विविध प्रकारची वादग्रस्त वक्तव्य सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. यावर धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी एका परिपत्रकामधून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाचा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

सत्‍ताधारींसह विरोधकांनाही टोला

गोटे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे, की आघाडीतील नेत्यांनी आपल्या जिभेला लगाम घालावा. आपण सत्‍तेत आहोत म्हणून चायनलवाले आपले चेहरे वारंवार दाखवतात. सत्ता चोर झाल्यानंतर आपल्याला कोण किती किंमत देतो हे मागील वर्षात अनुभवले आहे. फडणवीस आणि तावडेंनी एकत्र बसून आघाडीबद्दल काय बोलावे ते ठरवावे..! आपापसातील वर्चस्वाचे दर्शन घडवू नका. असे म्हणत सत्ताधारींसह विरोधकांना देखील टोला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री विनोद तावडे यांना टोला लगावला आहे.

Anil gote
शाळा इमारती नसल्याने झोपड्यांमध्ये शिक्षण; सातपुड्यातील गावांमधील धक्कादायक वास्तव

सत्‍तेत येण्यासाठी बळजबरी नाही

तसेच आघाडी सत्तारूढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करीत आहेत. आघाडीत असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत एकत्र आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वईच्छेने स्वीकारली आहे. असं म्हणत सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची गोटे यांनी चांगलीच कानउघाडणी या पत्रकातून केले असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com