भूषण अहिरे
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील पाच निरीक्षकांसह चार सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यात अलीकडेच जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या दोघा पोलीस निरीक्षकांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. आगामी निवडणुका पारदर्शी पद्धत्तीने पार पडाव्यात या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केल्याची माहिती आहे.
यामध्ये देवपूर पोलीस ठाणे, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे, दोंडाईचा पोलीस ठाणे, शिरपूर पोलीस ठाणे, पिंपळनेर पोलीस ठाणे, त्याचबरोबर आझादनगर पोलीस ठाणे व शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एप्रिल अखेर लोकसभा निवडणुका होतील असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते असं म्हणाले. पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांना नेहमी सर्वोत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावावी, असं ते यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पोलीस स्टेशनसाठी १०० पदांची मंजुरी देण्यात आली आहे. गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांनी कठोरपणे कारवाई करावी. पोलीस विभागाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना निधीतून निधी देण्यात येत आहे. या निधीतून पोलिसांसाठी वाहने, अत्याधुनिक यंत्रणा, गृहप्रकल्प इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत.
पोलिसांनी त्यांच्या तंदुरुस्तीसाठी लक्ष द्यावे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांचे उदात्तीकरण होता कामा नये. गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला पाहिजे. पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होणारे कृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली काम न करता गुन्हेगारी मोडून काढावी. सध्या पोलिसांच्या संकल्पनेत बदल झाला आहे. स्मार्ट पोलिसिंग च्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यात चांगले नाते निर्माण होत आहे, असे पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.