धुळे महापालिकेत कचरा; विरोधक पुन्हा आक्रमक

धुळे महापालिकेत कचरा; विरोधक पुन्हा आक्रमक
Dhule corporation
Dhule corporation
Published On

धुळे : विरोधकांनी अनेकदा कचऱ्याच्‍या मुद्यावर आवाज उठविला. तरी देखील प्रशासनातर्फे उपाययोजना करत कचऱ्याची विल्‍हेवाट लावली नाही. यामुळेच आजच्‍या सभेत देखील विरोधकांनी कचऱ्याच्‍या प्रश्‍नावर आवाज उठविला. (dhule-news-Waste-in-Dhule-Municipal-Corporation-The-opponent-is-aggressive-again)

धुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज पुन्हा एकदा विरोधक कचऱ्याच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक भुमिका मांडली. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेमध्ये अशाच पद्धतीने बॅनर व कचऱ्याच्या पिशव्या झळकावत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कचऱ्याच्या मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर देखील अद्यापही धुळे शहरामध्ये महानगरपालिका प्रशासनातर्फे कचरा साफ केला जात नसल्याचा आरोप लावत नागरिकांना त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी लावला आहे.

पुन्‍हा टाकला कचरा

विरोधकांनी महापालिकेत झालेल्‍या स्थायी समितीच्या सभेत कचरा टाकला होता. त्‍यानंतर आजच्‍या सर्वसाधारण सभेमध्ये देखील बॅनरबाजी करत असतानाच थेट महासभेत कचरा आणून टाकला आहे. त्यामुळे आजची महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा देखील पुन्हा एकदा कचऱ्याच्या मुद्द्यावरून वादामध्ये सुरू असल्याचे बघावयास मिळाले आहे.

Dhule corporation
महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन; हजर असूनही दाखविले गैरहजर

सभेत कचरा तरीही..

समाजवादी पार्टीच्या अमीन पटेल यासह इतर नगरसेवकांनी महासभेमध्ये थेट कचरा आणून उपमहापौर व पालिका अधिकाऱ्यांच्या समोर टाकल्यामुळे एकच वाद या दरम्यान सुरू झाला. परंतु सत्ताधाऱ्यांना व पालिका प्रशासनाला यापूर्वी देखील विरोधकांनी कचऱ्याचा मुद्दा निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील या संदर्भात कुठल्याही प्रकारची दखल पालिका प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप विरोधकांनी लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com