धुळे : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दिग्‍गजांनी भरले उमेदवारी अर्ज

धुळे : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दिग्‍गजांनी भरले उमेदवारी अर्ज
Dhule District Bank
Dhule District Bank
Published On

धुळे : धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया होत आहे. बुधवारी अंतिम दिवस असल्‍याने आज अनेक दिग्‍गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. (Dhule-news-Veterans-filled-nomination-forms-for-District-Bank-elections)

धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेच्‍या निवडणूकीसाठी २१ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया होत आहे. तर २२ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना २० ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यात उद्या म्हणजेच १९ ऑक्टोबरला ईद ए मिलादची सुट्टी असल्याने अर्ज भरण्यासाठी बुधवारचा एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यासह दिग्गजांनी आजच उमेदवारी अर्ज भरणे पसंत केले आहे.

८ नोव्‍हेंबरपर्यंत माघारी

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सतरा जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. अर्ज दाखल केल्‍यानंतर २२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे.

Dhule District Bank
JDCC Bank Election : तीन उमेदवार बिनविरोध; भाजपला धक्‍का

महाविकास आघाडीचा लागणार कस

जिल्हा बँकेवर आघाडीतील राजवर्धन कदमबांडे यांची सत्ता होती. परंतु या निवडणुकीच चित्र वेगळे बघावयास मिळत आहे. गेल्यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान मानले जाणारे दिग्गज नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल होते. यावेळी मात्र त्यांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अगदी सोपी मानली जात आहे. राजवर्धन कदमबांडे तसेच अमरीशभाई पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीसाठी मात्र ही निवडणूक चांगलीच डोकेदुखीची ठरणार असल्याचेच दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com