सीसीटीव्ही फुटेज चेक करताना खोलली शिक्षकाची पोल; तक्रार करणाऱ्या लिपिकावरच कारवाई

सीसीटीव्ही फुटेज चेक करताना खोलली शिक्षकाची पोल; तक्रार करणाऱ्या लिपिकावरच कारवाई
cctv
cctvsaam tv
Published On

धुळे : साक्री तालुक्यातील म्हसदी गावातील गंगामाता कन्या विद्यालयातील गुरु व शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु हा प्रकार उघडकीस आणणार्‍या लिपीकाला मुख्याध्यापकांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम करण्यात आले (Dhule News) असल्याचा आरोप संबंधित क्लार्कने लावला आहे. (dhule Teacher pole opened checking CCTV footage Action against the complaining clerk)

मुख्याध्यापकांनी संबंधित अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला (Teacher) पाठीशी घालत क्लार्कलाच कामावरून काढून टाकल्याचा आरोप देखील लावण्यात आला आहे. यासंदर्भात न्याय न मिळाल्याने संबंधित क्लार्कने सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शिक्षकासह मुख्याध्यापिका व सहशिक्षक हे पोलीस कारवाईच्या भीतीने पसार झाले आहेत.

cctv
केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नसल्याने राज्यात भारनियमन; पालकमंत्री गुलाबराव पाटील

साक्री (Sakri) तालुक्यातील गंगामाता कन्या विद्यालयात शाळेमध्ये घडलेल्या एका वादासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची जिम्मेदारी शाळेतील क्लार्क विजय भिलाजी अहिरे यांना तेथील वरिष्ठांनी दिली. सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असतांना अचानक क्लार्कला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले कौतिक साहेबराव चव्हाण या शिक्षकाचे तेथील विद्यार्थिनीसोबतचे अश्लील चाळे निदर्शनास आले. शिक्षकाच्या या चाळ्यांसंदर्भातील सर्व माहिती क्लार्कने तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा देवरे व त्यांचे पती उपशिक्षक नरेंद्र देवरे यांना दिली. परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम मुख्याध्यापिकांतर्फे करण्यात आले असल्याचा आरोप क्लार्कने केला आहे.

क्‍लर्कला कामावरून कमी करण्याचे आदेश

मुख्याध्यापकांनी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पाठीशी घालण्यासाठी हा सर्व प्रकार उघडकीस आणणार्‍या क्लार्कलाच कामावरून काढण्याचे आदेश दिले. यासंदर्भात जवळपास दोन वर्ष शिक्षण विभागाच्या पायऱ्या झीजऊन या क्लार्कने न्यायाची मागणी केली. परंतु या क्लर्कला दोन वर्ष फक्त आणि फक्त निराशाच पदरी पडली.

अखेर पोलिसात केली तक्रार

अखेर या क्लार्कने साक्री पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तक्रार दाखल केली. या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकासह त्यास पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापिका व उपशिक्षक हे पोलीस कारवाईच्या भीतीने पसार झाले आहेत. साक्री पोलीस या तिघांचाही शोध घेत असून या प्रकरणामध्ये नाहक बळी गेलेला क्लार्क मात्र शिक्षण मंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा करीत बेरोजगारीच्या झळा सोसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com