शालेय पोषण आहारविना विद्यार्थी उपाशी

शालेय पोषण आहारविना विद्यार्थी उपाशी
Poshan Aahar
Poshan Aaharsaam tv
Published On

धुळे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेली शिक्षणप्रणाली सुरळीत करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शाळा पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी (ZP School) महत्त्वाकांक्षी असलेली योजना शालेय पोषण आहार ही अद्यापही सुरू करण्यात आली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशीपोटीच शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. (dhule news Students starve without school nutrition)

Poshan Aahar
चुकीचे रीडिंग; राज्यातील सहा वीजमीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ

गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आलेला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे पुन्हा एकदा शाळा (School) सुरु करण्याचा निर्णय शाळा प्रशासन व शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. 31 जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली. विद्यार्थी देखील शाळेमध्ये पोहोचले. परंतु या विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार म्हणजेच शालेय पोषण आहार (Poshan Aahar) अद्यापही प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फटका बसताना दिसून येत आहे.

विद्यार्थी उपस्थितीवर परिणाम

शालेय पोषण आहार ही योजना सुरू केल्यापासून याचा सकारात्मक परिणाम हा विद्यार्थ्यांच्या उपस्थिती वरती दिसून येत होता. परंतु गेल्या 31 जानेवारीपासून जिल्हा परिषदेचे सर्व वर्ग सुरू करण्यात आले; परंतु शालेय पोषण आहार ही योजना मात्र सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांना उपाशी पोटीच शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसून येत असून शालेय पोषण आहार ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर दिसून येणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने लवकरात लवकर शालेय पोषण आहार ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांना तर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com