St Strike
St Strikesaam tv

St Strike: एसटीची याचिका सुनावणी लांबली; धुळ्यात कर्मचारी संपावर कायम

एसटीची याचिका सुनावणी लांबली; धुळ्यात कर्मचारी संपावर कायम
Published on

धुळे : एसटी कामगारांचा ६५ दिवसांपासून संप सुरु आहे. मुंबई उच्च न्यायालयात ५ जानेवारीला सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी झाली नाही. परिणामी बुधवारी देखील कामगारांच्या संपावर तोडगा निघू शकलेला नाही. यामुळे धुळे (Dhule) बस आगारातील कर्मचारी संपावर कायम आहेत. (dhule news St strike petition hearing delayed Employees on strike in Dhule)

St Strike
Khedibhokri Bridge: हंगामी खेडीभोकर पूल अद्याप बंदच; नदीपात्रातून वाहनधारकांची कसरत

राज्‍य परिवहन महामंडळातील (St Strike) कर्मचारी गेल्‍या दोन महिन्‍यांपासून संपावर आहेत. विलगीकरनच्‍या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी संपावर ठाम आहेत. महामंडळाचे राज्‍य शासनात विलगीकरन व कर्मचारी संपावर उच्‍च न्‍यायालयात (High Court) ५ जानेवारीला सुनावनी होती. परंतु, ही सुनावणी होवू न शकल्‍याने तोडगा निघू शकलेला नाही. यामुळे दोन महिन्‍यांपासून सुरू असलेला संप मिटण्याची शक्‍यता कमीच झाली आहे.

तोपर्यंत माघार नाही

धुळे मध्यवर्ती आगारातील कामगारांनी संपावर (Dhule St Employee) कायम असल्याचा निर्धार केला. जोपर्यंत विलगिकरन होत नाही; तोपर्यंत माघार घेणार अशी भूमिका धुळ्यातील एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान आतापर्यंत आंदोलन निदर्शने केली. मात्र त्याचा कोणताच परिणाम होत नसल्यामुळे आता कामगारांची वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचेच दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com