Crime: स्‍वयंपाक केला नाही म्‍हणून पत्‍नीचा केला खून

स्‍वयंपाक केला नाही म्‍हणून पत्‍नीचा केला खून
Dhule  Shirpur Crime News
Dhule Shirpur Crime NewsSaam tv

शिरपूर (धुळे) : स्वयंपाक न केल्याचा राग आल्याने पतीने कुर्‍हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करुन पत्नीचा खून केला. ही घटना आज (14 ऑगस्‍ट) सकाळी दहिवद (ता.शिरपूर) येथील शेतात घडली. खून केल्यानंतर (Crime News) संशयित पती पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला होता. त्याला पोलिसांनी अटक केली. (Dhule Shirpur Crime News)

Dhule  Shirpur Crime News
चोपड्यात ‘सैराट’..बहिणीचा गळा आवळून, प्रियकराची गोळी झाडून हत्या

बालाबाई संजय पावरा (वय 24) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा विवाह (Marriage) पाच वर्षापूर्वी कुकड्या (ता.सेंधवा, जि. बडवानी) येथील संजय मुकेश पावरा याच्याशी झाला होता. उभयतांना रोहित व अशोक अशी दोन मुले आहेत. स्वयंपाकाच्या कारणावरुन संजय नेहमीच बालाबाईला मारहाण करीत होता. आठवडाभरापूर्वी तो पत्नी व मुलांना घेऊन दहिवद येथील जयवंत शिसोदे यांच्या शेतात रखवालदारीसाठी आला होता. बालाबाईचे माहेरील कुटुंबही जवळच राकेश पाटील यांच्या शिवारात राहते.

बहिण दिसली रक्‍तबंबाळ अवस्‍थेत

तिची आई सुलाबाई हिने रविवारी नातवंडांना घेऊन येण्यासाठी मुलगी नायला हिला बालाबाईकडे पाठवले. तेथे झोपडीबाहेर खाटेवर रक्तबंबाळ अवस्थेत बालाबाई पडली होती. ते दृश्य पाहून नायला आईकडे पळत गेली. माहेरील लोकांनी येऊन पाहिले असता बालाबाई निपचित पडल्याचे दिसून आले.

पतीने दिली खूनाची कबुली

घटनेबाबत थाळनेर पोलिसांना (Police) सूचित करण्यात आले. डीवायएसपी दिनेश आहेर, थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळच संजय पावरा बसून होता. त्याच्याजवळ रक्ताने माखलेला कुर्‍हाडीचा दांडा पडला होता. त्याचा मुलगा रोहित याच्याकडे चौकशी केल्यावर स्वयंपाक न केल्याच्या वादातून वडिलांनी कुर्‍हाडीच्या उलट्या दांड्याने बालाबाईला मारहाण केल्याचे त्याने सांगितले. संशयित संजय पावरा याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सुलीबाई पावरा हिने दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक उमेश बोरसे तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com