Dhule: मेंढ्या चोरणारी टोळी राजस्थानमधून ताब्‍यात

मेंढ्या चोरणारी टोळी राजस्थानमधून ताब्‍यात
Dhule Police
Dhule PoliceSaam tv

धुळे : धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मेंढपाळांच्या जनावरांची चोरी केली जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Crime) पथकाने या मेंढ्या चोरणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. (Dhule LCB News)

Dhule Police
Wardha: सावरडोह नदीवरील पुलाची उंची वाढवा; नागरिकांसोबत विद्यार्थ्यांचा रास्तारोको

धुळे (Dhule) जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यामध्ये ठेलारी बांधवांच्या वाडीवस्तीवरून मोठ्या प्रमाणात मेंढ्या चोरी जात असल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या वाढत्या तक्रारींची दखल घेत (Police) पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मेंढ्या चोळणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळण्यासंदर्भात आदेशीत केले होते. या आदेशाचे पालन करीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्री फिरवले असता राजस्थान येथून या मेंढ्या चोरणाऱ्या टोळीतील पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

राजस्‍थानहून घेतले ताब्‍यात

मेंढ्या चोरून ही टोळी ज्या व्यापाऱ्याला विक्री करत होते. या व्यापाऱ्याच्या देखील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने मुस्क्या आवळल्या असून या कारवाईत एकंदरीत सहा जणांच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे आवळण्यात आल्या आहेत, या गुन्ह्या दरम्यान वापरण्यात आलेली चार चाकी वाहनासह तीन लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईदरम्यान हस्तगत केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com