धुळे : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. यामुळे अनेकजण अडचणीत सापडले आहेत. यातच पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या साक्री येथील एसटी कर्मचाऱ्याने सुसाईट नोट लिहीत जीवन संपविले. (dhule-news-sakri-aagar-ST-driver-suicide-Reason-for-non-payment-of-salary)
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे गेल्या काही महिन्यांपासून नियमित पगार होत नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एसटी महामंडळमधील चालक पदावर कार्यरत असलेल्या कमलेश बेडसे (वय ४५) कर्मचाऱ्याने एसटी महामंडळाचा जबाबदार भरत याबाबतची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे.
एसटी महामंडळास धरले जबाबदार
या संदर्भात नातेवाइकांनी व सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत साक्री डेपो बंद केला आहे. एसटी महामंडळास जबाबदार धरत आत्महत्या ग्रस्त कर्मचार्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. या मागणी संदर्भात एसटी कर्मचारी संघटना देखील आक्रमक झाल्या शाबास मिळत आहे कुठल्याही प्रकारची बस डेपोतून बाहेर न जाऊ देण्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
पगार नसल्याने अडचणीत
वेळेवर पगार होत नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. तशी सुसाईट नोट चालक बेडसे यांनी लिहून ठेवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.