धुळ्यातही महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

धुळ्यातही महसूल कर्मचारी बेमुदत संपावर
Dhule news
Dhule newsSaam tv
Published On

धुळे : महसूल कर्मचाऱ्यांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे राज्य शासनातर्फे सतत दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप लावत राज्य शासनाच्या या दुर्लक्षितपणाचा निषेध करण्यासाठी महसूल विभागाच्या धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. (dhule news Revenue workers on indefinite strike in Dhule district)

Dhule news
महसूल कर्मचारी बेमुदत उपोषणावर; जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

महसूल विभागामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवली गेले नाही. त्यामुळे रिक्त असलेली पदे भरली न गेल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडला असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यात यावी; या प्रमुख मागणीसह आणखी इतर प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.

घोषणाबाजी करत निषेध

धुळे जिल्हाधिकारी परिसरात असलेल्या क्युमाईन क्लब या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली असून, राज्य शासनाच्या दुर्लक्षितपणा विरोधामध्ये या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com