धुळे : उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून थंडीची लाट आहे. प्रचंड गारठा वाढला असून धुळ्याच्या तापमानात विक्रमी घट झाली आहे. गेल्या काही वर्षातील निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली आहे. आज धुळ्यात २.५ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची (Temperature) करण्यात आली नोंद. (dhule news Record low temperature recorded last two year)
गेल्या तीन दिवसांपासून धुळ्याच्या (Dhule) तापमानामध्ये विक्रमी घट झाल्याचे बघायला मिळाले आहे. पाकिस्तानात (Pakistan) आलेल्या धुळीच्या वादळानंतर हवामान विभागातर्फे तापमानामध्ये घट होऊन थंडीची लाट पसरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार हळूहळू तापमानामध्ये घट होऊन आज २.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हाडे गोठवणार्या थंडीमुळे धुळेकर चांगलेच गारठले आहेत. उधार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेताना धुळेकर बघावयास मिळत आहे.
दोन वर्षातील निच्चांकी तापमान
धुळ्यात थंडीची लाट बघावयास मिळत आहे. आज देखील धुळ्यामध्ये २.५ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमान असून गेल्या दोन वर्षातील हे सर्वात कमी असलेले विक्रमी नीचांकी तापमान मानले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.