धुळे : संपूर्ण राज्यभरात पंधरा ते अठरा वयोतील मुला-मुलींना कोरोनाची पहिली लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये सोमवारी एकाच दिवसात धुळे जिल्ह्यामध्ये नऊ हजार ३८१ मुला-मुलींना कोरोनाची लस देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यामध्ये लसीकरणा (Corona Vaccination) संदर्भात विक्रमी लसीकरण यादीमध्ये धुळे (Dhule) जिल्ह्याचा दुसरा क्रमांक नोंदविला गेला आहे. (dhule news Record corona vaccination in Dhule district Second place in the state)
आरोग्य विभागातर्फे व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आवाहनानंतर सामाजिक संघटनांनी देखील सहभाग नोंदवला. यामुळे राज्यामध्ये विक्रमी लसीकरण करण्यात धुळे जिल्ह्याचा (Dhule District) दुसरा क्रमांक नोंदविण्यात आला असल्याचे देखील आरोग्य प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले. यापुढे देखील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी अशाच पद्धतीने लसीकरण पूर्ण होईपर्यंत विविध उपक्रम राबवून प्रशासनाला मदत करण्याचे देखील आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
८.२७ टक्के लसीकरण
आरोग्य विभागातर्फे व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आवाहनानंतर सामाजिक संघटनांनी देखील सहभाग नोंदविला. राजकीय व सामाजिक संघटनांनी लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट असेल तसेच लसीकरण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यास वही-पेन वाटप अशा पद्धतीचे उपक्रम राबविण्यात आले होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये लसीकरण संदर्भात जनजागृती निर्माण झाल्याने विक्रमी लसीकरण (Dhule Corona Vaccination) होण्याकरिता प्रशासनाला या संघटनांचा चांगलाच हातभार लागला असून सोमवारी दिवसभरात झालेल्या लसीकरणात जवळपास ८.२७ टक्के लसीकरण प्रशासनाच्या प्रयत्नानंतर झाले आहे.
लसीकरणानंतर वही– पेन भेट
राजकीय व सामाजिक संघटनांनी लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट असेल तसेच लसीकरण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यास वही-पेन वाटप अशा पद्धतीचे उपक्रम राबविण्यात आले होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये लसीकरण संदर्भात जनजागृती निर्माण झाल्याने विक्रमी लसीकरण होण्याकरिता प्रशासनाला या संघटनांचा चांगलाच हातभार लागला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.