प्रवासात जडलेली ही आवड छंदात परिवर्तित; साकारली हजारो नखचित्रे

प्रवासात जडलेली ही आवड छंदात परिवर्तित; साकारली हजारो नखचित्रे
Teacher
Teachersaam tv
Published On

कापडणे (धुळे) : धुळे शहरातील जे. आर. सिटी विद्यालयातील शिक्षक रवींद्र भामरे यांनी डाव्या हाताने नखचित्रकारी करण्याचा छंद जोपासला आहे. ते डाव्या अंगठ्याने काही क्षणात नखचित्र साकारतात. नखचित्रकलेची ही कला टिकविण्यासाठी ते विद्यार्थ्यांना या कलेचे प्रशिक्षण देत आहेत. (Dhule News) प्रवासात जडलेली ही आवड छंदात परिवर्तित झाली अन् शेकडो चित्रे त्यांनी साकारली आहेत. प्रासंगिक चित्रे काढून ते बघणाऱ्यांना अवाक् करतात. (dhule passion for travel turned into a hobby creat thousands of nails drawing)

Teacher
वाढील दहा गटांच्‍या पुनर्बांधणीत जिल्‍हा परिषदेत राजकीय फेरफार

चित्रकला (Painting) म्हणून या कलेला ओळखले जाते. छोट्याशा कार्डशीटवर नखाने दाब देऊन छटा कोरली जाते. या चित्रात एकदा कोरलेली छटा खोडता येत नाही. एक छोटीशी चूकही चित्र साकारताना चित्राला बेढंग करते. त्यामुळे अचूक चित्र काढण्याची त्यांनी सवय केली आहे. आवश्यक त्या ठिकाणी दाब टाकून चित्र काढावे लागते. सूर्यप्रकाशात धरल्यावर या चित्राची सुंदरता अधिकच वाढते. चित्रांमधील बारीक छटाही ते हुबेहूब साकारतात. अवघ्या चार ते पाच मिनिटांत चित्र काढतात.

वारसा जपण्यासाठी अनेकांना मार्गदर्शन

शहरातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये (School) कार्यरत असलेले भामरे मराठी व भूगोल विषय शिकवतात. त्यांनी आत्तापर्यंत डाव्या हाताने हजारो नखचित्रे रेखाटली आहेत. सूर्यप्रकाशात ही रेखाचित्रे बघितल्यावर भामरे यांच्या कलेची जाणीव होते. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी शाळेच्या कामानिमित्त धुळे-कापडणे प्रवास करताना त्यांनी ही कला शिकण्यास सुरवात केली. या कलेबद्दल त्यांचा अनेकांनी गौरव केला आहे. या कलेचा वारसा जिवंत राहावा, यासाठी ते अनेकांना मार्गदर्शन करत आहेत.

विद्यार्थ्यांसह बरेचसे ही कला शिकण्यासाठी येतात. इतर कलांपेक्षा ही कला अगदी वेगळी आहे. यामुळे कल्पनाशक्तीलाही चालना मिळते. यात एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. भविष्यात नियमित प्रशिक्षण वर्ग सुरू करायचे आहेत.

-रवींद्र भामरे, धुळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com