Accident: कंटेनर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू

कंटेनर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू
Accident
Accidentsaam tv

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाणा परिसरामध्ये कंटेनरवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये कंटेनर पलटी झाले. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. (dhule mumbai aagra highway accident container driver died on the spot)

Accident
St Strike: तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; एसटी कर्मचाऱ्यांची संतप्‍त प्रतिक्रीया

नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) धुळ्याकडून शिरपूरकडे (Shirpur) भरधाव वेगाने कंटेनर जात होते. परंतु, या कंटेनरवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. चालकाने कंटेनर रस्त्याच्या कडेला नेत उतरविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र कंटेनरचा वेग अधिक असल्‍याने खड्ड्यात पलटी झाला.

वाहक दबला गेला

अपघातामध्ये (Accident) वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस (Police) घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने कंटेनर व झाडाच्यामध्ये अडकलेल्या वाहन चालकाला बाहेर काढण्यात आले. परंतु या अपघातामध्ये दबल्या गेल्यामुळे वाहन चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नरडाणा पोलीस व महामार्ग पोलिसांतर्फे या घटनेचा तपास सुरु असून नरडाणा पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com