St Strike: तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; एसटी कर्मचाऱ्यांची संतप्‍त प्रतिक्रीया

तर मुख्यमंत्रीनी राजीनामा द्यावा; एसटी कर्मचाऱ्यांची संतप्‍त प्रतिक्रीया
St Strike
St Strikesaam tv

बीड : बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. आता 100 दिवसानंतरही न्याय मिळत नसेल, तर कर्मचाऱ्यांचा संयम सुटत आहे. या संपाला हिंसक वळण लागले, तर त्याला सरकार जबाबदार असेल. कर्मचाऱ्यांना न्याय देता येत नसेल तर मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा. अशी संतप्त प्रतिक्रिया बीडमधील (Beed) आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. (beed CM thackeray should resign Outraged reaction of ST employees)

St Strike
भाजपला धक्‍का; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

राज्य शासनाने इतर सात महामंडळांना शासनात (St Strike) विलीनीकरण करून घेतले. मात्र ९२ हजार कर्मचारी गेल्या शंभर दिवसांपासून लढा लढत आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला मुख्यमंत्र्यांना लक्ष नाही. आता तरी किमान राज्य शासनाने आमचा विचार करावा. अन्यथा आंदोलनाचे स्वरूप उग्र होईल. ८२ लोकांच्या बलिदानानंतर ही अद्याप सरकार झोपेचे सोंग घेत असेल, तर आम्हाला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. अशी प्रतिक्रिया बीडमधील (St Employee) कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलीय.

शासनाला माणुसकी आहे की नाही?

राज्य शासनात (MSRTC) विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या 100 दिवसापासून संपावर ठाम असलेल्या बीडमधील कर्मचार्‍यांनी आज आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. शासन-प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देईल का? या शासनाला माणुसकी आहे की नाही? आमचे दुःख कळते की नाही. असा सवाल उपस्थित केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com