वार्सेत आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप

आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप
MLA Manjula Gawit
MLA Manjula Gawit
Published On

धुळे : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप करण्यात येते. या अनुषंगाने साक्री तालुक्यातील वार्सा येथे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप करण्यात आले आहे. (dhule-news-mla-manjula-gawit-Distribution-of-khawati-kits-to-tribal-aria-in-Warsa)

आदिवासी बांधवांना राज्य शासनातर्फे दिलासा देण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात असते. साक्री तालुका हा आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आदिवासी बांधव शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. परंतु यंदा पावसाने धुळे जिल्ह्यात ओढ दिल्यामुळे साक्री तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडले असल्याचे बघावयास मिळाले आहे. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे शासनातर्फे आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान देण्यात आले आहे.

MLA Manjula Gawit
महाजनांनी उघडले मंदिर; महाराष्‍ट्रातच मंदिरात कोरोना येतो का; आमदार महाजन यांचा सवाल

आदिवासींना फायदा

आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते या खावटी किटचे वाटप आदिवासी बांधवांना करण्यात आले आहे. या खावटी किटच्या वाटप कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com