Leopard Attack: बिबट्याने पाच बकऱ्यांचा पाडला फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचा वातावरण

बिबट्याने पाच बकऱ्यांचा पाडला फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचा वातावरण
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

धुळे : साक्री तालुक्यातील ओझरदे परिसरात बिबट्याची दहशत बघावयास मिळत आहे. बिबट्याने (Leopard) शेतातील पाच बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Live Marathi News)

Leopard Attack
Nandurbar News: रावेर बाजार समितीप्रमाणे केळीला हवा दर; नंदूरबार जिल्ह्यातील उत्पादकांची मागणी

ओझरदे येथील शेतकरी रड्या मोन्या सोनवणे यांच्या घराशेजारी रात्री नेहमीप्रमाणे शेळ्या बांधल्या होत्या. त्यातून तीन बोकड व दोन शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याचे सकाळी लक्षात आले. शेतकऱ्याचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचा वातावरण

परिसरात यापूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचा वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा (forest Department) वन विभागातर्फे बंदोबस्त करण्यात यावा; अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे वारंवार करण्यात येत असून देखील, वन विभागातर्फे याबाबत कुठल्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com