Dhule: सुगंधी पान मसाला, गुटख्‍याने भरलेला ट्रक ताब्यात

सुगंधी पान मसाला, गुटख्‍याने भरलेला ट्रक ताब्यात
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : राज्यामध्ये बंदी असलेला गुटखा व पान मसाल्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व वाहकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान वीस लाखांच्या गुटख्यासह जवळपास तीस लाखाहून अधिकचा मुद्देमाल (Police) पोलिसांनी जप्त केला आहे. (Dhule News LCB Action)

Dhule News
रेल्वेतून २ हजार ९३६ जणांचा फुकट प्रवास; अठरा लाखांचा दंड वसूल

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (Dhule LCB) पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार इंदोरकडून भिवंडीकडे (Dhule) धुळे मार्गे गुटख्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथक तैनात केले. सरवड फाट्याजवळ संबंधित गुटख्याने भरलेल्या ट्रकला पोलिसांनी अडवत चालकाला ट्रकमध्ये असलेल्या माला संदर्भात विचारपूस केली.

तीस लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्‍त

ट्रकचालक व वाहकातर्फे उडवा उडवीचे उत्तरे मिळाल्यानंतर संबंधित ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा पोलिसांना आढळून आला. या संपूर्ण मुद्देमालासह पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे. या कारवाई संदर्भातील माहिती पोलीस अधिक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com