अवैध सावकारीचे घबाड, बँक लॉकरमधून काढली कोटींची रोकड

अवैद्य सावकारीचे घबाड..सापडली चार कोटीची रोकड; बँक लॉकरमधून काढली करोडोची रोकड
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : आपण बघत असलेला हा कुबेरचा खजाना नसून धुळ्यातील एका सावकाराने अवैध सावकारीमधुन जमवलेली माया आहे. यावर गेल्या दोन दिवसांपासून धुळे (Dhule) पोलिसांची धाडसत्र सुरू आहे. दोन दिवसात तब्बल चार कोटींहून अधिकची रोकड सह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (dhule news Illegal lenders Four crore cash withdrawn from bank locker)

Dhule News
ऑनलाइन व्‍यवसायाचे आमिष; महिलेची तीन लाखात फसवणूक

धुळे शहरामध्ये पोलिसांनी अवैध सावकारी विरोधात धुळ्यातील एका सावकाराच्या घरावर बुधवारी (१ जून) छापा टाकला असता जवळपास कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम तसेच खरेदीखतचे कागदपत्र, कोरे स्टॅम्प, त्याचबरोबर कोरे चेक पोलिसांना आढळून आले होते. त्यानंतर त्याच सावकाराचे जळगाव पीपल्स बँकेत (Bank) असलेले लॉकर आज तपासण्यात आले असता त्यामध्ये देखील दोन कोटीहून अधिकची रोख रक्कम, त्याचबरोबर एकोणवीस लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने (Gold) लॉकरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सावकाराचे अद्याप (Shirpur) शिरपूर पीपल्स बँकेचे लॉकर व योगेश्वर पतपेढीमधील लॉकर अद्यापही तपासने बाकी असतानाच या सावकाराने जवळपास चार कोटीहून अधिकची रोख रक्कम आपल्या लॉकरसह घरामध्ये जमवून ठेवल्याचे आढळून आले आहे.

जमिन, मालमत्‍ता होणार जप्‍त

आज तपासणी केलेल्या जळगाव पीपल्स बँकेच्या लॉकरमधून व सावकाराच्या घरातून मिळालेल्या खरेदी खताच्या दस्तावेजांची देखील आता सखोल तपासणी पोलीस प्रशासनातर्फे सुरू आहे. या खरेदी खताच्या कागदपत्रांमध्ये जर खरेदी केलेल्या जमिनी सावकारी कर्ज वाटपातून पीडितांच्या जप्त करण्यात आल्या असतील, तर या सर्व जमिनी व मालमत्ता पोलीस प्रशासनातर्फे जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सध्या आझादनगर पोलीस ठान्यामध्ये या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सावकाराच्या मुसक्या धुळे पोलिसांनी आवळल्या आहेत. तसेच संबंधित सावकाराच्या जाचामुळे कुणाच्या जमिनी किंवा मालमत्ता या सावकाराच्या ताब्यात गेल्या असतील तर अशा पीडितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन धुळे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com