Heavy Rain: धुळे तालुक्‍यात मुसळधार; अनेक गावांमध्‍ये शिरले पुराचे पाणी

धुळे तालुक्‍यात मुसळधार; अनेक गावांमध्‍ये शिरले पुराचे पाणी
Heavy Rain Dhule
Heavy Rain DhuleSaam tv

धुळे : धुळे तालुक्यात रविवारी मध्यरात्री ते सोमवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर बरसलेल्या पावसाने (Rain) अनेक गावे जलमय झाली. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान (Flood Effect) झाले तसेच अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये बोरी महापुरामुळे पाणी शिरले. (Dhule News Heavy Rain)

Heavy Rain Dhule
Gram Panchayat Election: शिरपूर तालुक्‍यात पहिल्या निकालात भाजपची सरशी

धुळे (Dhule) तालुक्‍यातील धामणगाव, शिरूड, बोरकुंड, विंचूर, आर्वी, रतनपुरा, निमगुळ, बोधगाव, बाबरे, कुंडाणे, वेल्हाणे या गावात अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजविला आहे. तसेच बोरी पट्ट्यात रविवारी रात्री 2 वाजेपासून पाऊस सुरू झाला. पावसामुळे बोरी नदी व तिच्या उपनद्या कानवली, मांजूर नदी व नाले तुडूंब झाल्याने अनेक बोरकुंड, रतनपुरा, शिरूड, धामणगाव निमगुळ, गावात पाणी शिरले. घरात व दुकानात असलेले जीवनावश्यक वस्तू धान्य वाया गेले.

मंदिराची भिंत ढासळली

धामणगाव येथील नदीकाठी असलेले विठ्ठल मंदिर संरक्षित भिंत देखील या पुरामुळे ढासळली आहे. परिसरातील शेती पाण्याखाली गेली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे पशुधन जनावरे वाहून गेल्‍याचे वृत्त आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com