पीएचडीसाठी मार्गदर्शकास देवू केले पन्‍नास हजार; शिक्षक एलसीबीच्‍या ताब्‍यात

पीएचडीसाठी मार्गदर्शकास देवू केले पन्‍नास हजार; शिक्षक एलसीबीच्‍या ताब्‍यात
Bribe
Bribesaam tv

धुळे : पीएचडीसाठी मार्गदर्शकास पन्नास हजाराची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. धुळे (Dhule) शहरातील नगाव बारी चौफुली जवळील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. (dhule news Fifty thousand bribe paid to guide for PhD Teacher under LCB)

Bribe
Cotton: पांढऱ्या सोन्याच्या भावात चढउतार; अकरावर गेलेला भाव पुन्हा आला खाली

बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (NMU) ‘पीएचडी’चे मार्गदर्शक असलेल्या तक्रारदारास पन्नास हजारांची लाच (Bribe) देऊ केली. तक्रारदाराची इच्छा नसताना देखील शिक्षक वळवी यांच्याकडून संबंधितांना वारंवार लाच घेण्यासंदर्भात बोलणे सुरू होते. त्यास विरोध केल्यानंतर देखील शिक्षक वाळवी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. याबाबत अखेर तक्रारदार यांनी धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Dhule LCB) संपर्क करून या संदर्भात तक्रार दिली.

सापळा रचत पकडले

तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या (LCB) टीमने धुळ्याच्या नगावबारी परिसरात असलेल्या हॉटेल बालाजी येथे सापळा रचला. यानंतर ठरल्याप्रमाणे सुकेंद्र वळवी हे पीएचडीचे मार्गदर्शक तथा तक्रारदार यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम देत असताना वळवी यांना रंगेहात पकडण्यात आले. लाच देणार्‍या शिक्षका विरोधात देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवपूर पोलिस (Police) व लाचलुचपत विभागातर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com