धुळ्यातील भीषण आगीनंतर आपत्ती व्यवस्थापन वाहन सेवेत

धुळ्यातील भीषण आगीनंतर आपत्ती व्यवस्थापन वाहन सेवेत
Dhule Corporation
Dhule CorporationSaam tv

धुळे : शहरामध्ये पाच कंदील परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अग्नितांडव दरम्यान प्रशासनाला आग विझवताना अडचणी आल्‍या होत्‍या. ही बाब लक्षात घेता धुळे महापालिकेच्या (Dhule Corporation) आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आपत्ती व्यवस्थापन वाहनाचे लोकार्पण आज धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप कर्पे यांनी केले आहे. (dhule news Disaster management vehicle service after a severe fire in Dhule)

आपत्‍ती व्‍यवस्‍थापन वाहनाच्या माध्यमातून आपत्कालीन घटनांच्या दरम्यान आपत्ती व्यवस्थापनास मोठी मदत होणार आहे. या वाहनामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगात येणारे सर्व साहित्य आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपत्कालीन विभागाच्या जवानांना दुर्घटनेच्या वेळी परिस्थिती निवारण्यासाठी प्रयत्न करत असताना लागणारे सर्व महत्त्वपूर्ण साहित्यचा वापर करता येणार आहे. त्यामुळे परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्कालीन जवानांना याची मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी लोकार्पण प्रसंगी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com