धुळे : धुळे महापौर पदासाठी आज अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याकारणाने महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग बघावयास मिळाली आहे. या आधीचे महापौर पद अडीच वर्ष भाजपच्या चंद्रकांत सोनार यांनी भूषवले होते. (dhule-news-Dhule-corporation-mayor-election-the-last-date-to-fill-the-application-Almost-of-the-candidates)
महापौर पद एससी व ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात देखील धाव घेण्यात आली होती. याबाबद न्यायालायतर्फे ओबीसी आरक्षणाचा निकाल देण्यात आला. त्यामुळे आता धुळे महापालिकेवर महापौर पदी ओबीसी उमेदवार बसणार हे निश्चित आहे.
दगाफटका झाल्यास चित्र बदलणार
धुळे महानगरपालिकेच्या तब्बल ७० जागांपैकी ५० नगरसेवक भाजपचे निवडून आल्यामुळे भाजपचे नगरसेवक संख्या बलाबल जास्त आहे. त्यामुळेच यापूर्वीच्या अडीच वर्षांवर धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला होता. आता देखील संखीय बलाबल बघता भाजपला आपल्याच नगरसेवकांकडून दगाफटका न झाल्यास भाजपचा महापौर बसवण शक्य होणार आहे.
१७ ला निवड प्रक्रिया
महापौरपदासाठी वालीबेन मंडोरे, प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, संजय पाटील त्यांची नावे चर्चेत असून यापैकी कुठल्या उमेदवाराला संधी मिळते हे देखील बघण औचित्याच ठरणार आहे. 17 सप्टेंबर रोजी महापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.