धुळे : धुळ्यात परदेशातून परतलेल्या नागरिकांपैकी सहा नागरिक कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत आणखीनच भर पडली होती. परंतु या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार झाल्यानंतर आता सहा कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. (dhule news corona update from five patients from abroad corona free)
परदेशातून धुळे (Dhule) जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांच्या संख्येतही गुरुवारी पाचने भर पडली. त्यामुळे परदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांची संख्या ३४० वर गेली आहे. धुळ्यात परदेशातून आलेल्यांपैकी सहा कोरोनाबाधित (Corona Positive) आढळून आले होते. यातील पाच जण बरे झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भाची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेतर्फे तसेच जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोरोना संदर्भात सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळण्याची देखील आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गुरूवारी १५ जण बाधित
शहरासह जिल्ह्यात (Dhule Corona Update) सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन आकडी झेप घेतली. गुरुवारी (ता. ६) नवीन १५ बाधितांची भर पडली. यात धुळे जिल्ह्यातील १३, व इतर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात एक वर्षाच्या बालिकेचाही समावेश आहे. जिल्ह्यात आजअखेर कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या ३९ वर पोचली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.