धुळे : केंद्र सरकारमार्फत देशभरात जवळपास १०० कोटी लसीचा टप्पा पार केल्याचा गवगवा केंद्र सरकारमार्फत करण्यात आला. परंतु शंभर कोटी लसींचा टप्पा पार करण्यासाठी आरोग्य विभागाला अक्षरशः मृत व्यक्तींना देखील लस द्यावी लागली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (dhule-news-corona-second-dose-of-corona-to-the-dead-person)
देशात कोरोना लसीचा शंभर कोटीचा टप्पा पार केल्याची माहिती समोर आल्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपुर गावामध्ये एका मृत व्यक्तीला देखील कोरोनाचा दुसरा डोस दिल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्र सरकारच्यावतीने शंभर कोटी लसीकरण झाल्याचा दावा केला जात असताना ही घटना समोर आली आहे.
अन् दुसरा डोस घेतल्याचा संदेश
मालपुर गावातील बन्सीलाल सुका धनराळे या ६६ वर्षीय वृद्ध नागरिकास १० मार्च २०२१ रोजी कोरोनाच्या कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस आरोग्य विभागातर्फे मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर देण्यात आला. परंतु कोरोनाचा दुसरा डोस घेण्याआधीच बन्सीलाल धनराळे यांचा ६ एप्रिल २०२१ रोजी अकस्मात मृत्यू झाला. परंतु बन्सीलाल धनराळे यांच्या मोबाईलवर अचानक १९ ऑक्टोबरला त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मॅसेज आला. घरच्यांनी मोबाइलवर आलेल्या लसीकरणाच्या मेसेजची लिंक ओपन केली असता त्यावर ती बन्सीलाल यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याचे सर्टीफिकीट इशू करण्यात आले होते. मृत पावलेल्या बन्सीलाल धनराळे यांना कोरोनाचा दुसरा डोस दिल्याचे आरोग्य विभागातर्फे सर्टिफिकेट पाठविण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाचा चांगलाच गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
लक्ष्य पूर्ण करण्यासाठी..
बन्सीलाल धनराळे यांच्या परिवाराच्या ही बाब लक्षात आल्यामुळे डोस न देताच सर्टिफिकेट इशू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु देशभरात शंभर कोटी डोस पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारने अशा किती मृत पावलेल्या नागरिकांना आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीने डोस दिले असतील याची कल्पना देखील करणे अशक्य आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.